रणजी ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान दुर्दैवी घटना; युवा खेळाडूच्या मृत्यूमुळे खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Cricket News | सध्या भारताचा क्रिकेट संघ मायदेशात इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. चौथा सामना सुरू असून तीन सामन्यांमध्ये यजमान टीम इंडियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. एकीकडे भारताचा आंतरराष्ट्रीय संघ इंग्लिश संघाशी दोन होत करत आहे, तर दुसरीकडे टीम इंडियाचे तिकिट मिळवण्यासाठी भारताचे युवा शिलेदार देशांतर्गत क्रिकेटमध्ये घाम गाळत आहेत. पण, रणजी ट्रॉफीच्या उंपात्यपूर्व सामन्यात एक धक्कादायक घटना घडली अन् युवा खेळाडूच्या मृत्यूने एकच खळबळ माजली.

रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याचा थरार रंगला होता. या स्पर्धेदरम्यान एका खेळाडूचा मृत्यू झाल्याच्या बातमीने खळबळ उडाली. ही घटना बंगळुरू येथे सुरू असलेल्या एजिस साउथ झोन टूर्नामेंटमध्ये घडली, जिथे कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यात सामना सुरू होता. या सामन्यादरम्यान कर्नाटकचा क्रिकेटपटू के. होयसला याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात येत आहे.

खेळाडूच्या मृत्यूमुळे खळबळ

माहितीनुसार, होयसला आपल्या सहकारी खेळाडूंसोबत विकेट भेटल्यानंतर आनंद साजरा करत असताना त्याचा मृत्यू झाला. झाले असे की, सेलिब्रेशन करत असताना तो अचानक जमिनीवर पडला. जमिनीवर पडल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे 34 वर्षीय क्रिकेटपटूला मृत घोषित करण्यात आले.

होयसला याला एक सक्षम क्रिकेटपटू म्हणून ओळखले जात होते. तो कर्नाटक प्रीमिअर लीगचा देखील एक भाग होता, जेथे तो वोशिवामोग्गा लायन्स संघाकडून खेळला होता. त्याच्या निधनाच्या बातमीने केवळ क्रिकेटच नाही तर कर्नाटकातील राजकीय वर्तुळही हळहळले आहे.

 

Cricket News क्रीडा विश्व हळहळले

कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू यांनी होयसलाच्या निधनावर शोक व्यक्त केला. युवा खेळाडूचे निधन झाल्याने क्रिकेट वर्तुळात देखील एकच चर्चा रंगली आहे. होयसलाच्या सहकारी खेळाडूंसह अनेकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली.

दिनेश गुंडू होयसलाच्या निधनावर शोक व्यक्त करताना म्हणाले की, आमच्या क्रिकेटचे हे नुकसान आहे. त्याच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच दुःख झाले आहे. या कठीण काळात आमच्या संपूर्ण संवेदना त्याच्या कुटुंबासोबत आहेत. अलीकडे तरुणांमध्ये ज्या पद्धतीने हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, ती आपल्याला सावध करते.

News Title- K hoysala died during the Ranji Trophy match between Karnataka and Tamil Nadu
महत्त्वाच्या बातम्या –

आमिर खानला ‘त्या’ गोष्टीचा अजूनही होतोय पश्चाताप; मोठा खुलासा करत म्हणाला…

’12th Fail’ फेम विक्रांत मेस्सीच्या घरी चिमूकल्याचं आगमन; गोड फोटो आले समोर

हार्दिक पांड्याबाबत प्रसिद्ध क्रिकेटपटूचं धक्कादायक वक्तव्य, क्रिकेटविश्वात खळबळ

मुलीसाठी शाहीद कपूरने सोडली आवडती गोष्ट; कारण तुम्हालाही अभिमान वाटेल

Google Pay लवकरच बंद होणार?, महत्त्वाची माहिती आली समोर