Google Pay लवकरच बंद होणार?, महत्त्वाची माहिती आली समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Google Pay | गुगल पे (Google Pay) हे सध्या जगातील ऑनलाईन स्वरूपात आर्थिक व्यवहार करण्याचे एक उत्तम माध्यम आहे. एखादी वस्तू खरेदी करायची म्हटली तरी युजर्स गुगल पे (Google Pay) माध्यमातून पैसे पाठवण्याचं काम करत असतात. काही वेळा सुट्टे पैसे नसले की लगेच युजर्स “गुगुल पे’चा (Google Pay) वापर करत ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवतात. पण आता गुगल पे (Google Pay) बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अन्न वस्त्र निवाऱ्याप्रमाणेच आता ऑनलाईन ट्रांझेक्शन करणाऱ्यांसाठी गुगल पे महत्त्वाचं आहे. अमेरिका या देशामध्ये गुगल पे बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता अमेरिकेतील गुगल पे युजर्सला गुगल पे वापरता येणार नाही. याची तारीख देखील आता समोर आली आहे. 4 जून 2024 मध्ये अमेरिकेचे गुगल पे बंद होणार आहे. जूने व्हर्जन बंद करण्यात येणार असून पीअर-टू पीअर पेमेंट बंद होणार आहे.

अमेरिकेत एखाद्या व्यक्तीचे नातेवाईक जर राहत असतील तर त्यांना 4 जून 2024 च्या आधी केव्हाही पैसे पाठवता येऊ शकतात. मात्र त्यानंतर त्यांना पैसे पाठवता येणार नाही. अमेरिकेनंतर भारतामध्ये गुगल पे बंद होणार का? असा प्रश्न होता. मात्र भारतामध्ये गुगल पे सुरू आहे.

भारत आणि सिंगापूरमध्ये गुगल पे सुरू

अमेरिकेमध्ये गुगल पे बंद झाल्याची माहिती समोर येताच भारतात देखील हा निर्णय घेतला जाईल का? असा युजर्सला प्रश्न होता. मात्र सिंगापूर आणि भारत या दोन्ही देशामध्ये हे अॅप सुरू राहणार असल्याचं समजतंंय. गुगलने एका ब्लॅकमेगामध्ये म्हटलं आहे की, भारतात आणि सिंगापूरमध्ये गुगल पे सुरू राहणार आहे. या देशातील लाखो लोकांमध्ये कोणताही बदल होणार नाही.

गुगल पे ऐवजी गुगल वॉलेट अॅपचा वापर

कंपनी गुगल पे युजर्सला गुगल वॉलेट अॅप वापरण्याचा सल्ला देत आहे. यात व्हर्च्युअल डेबिटसारखी वैशिष्टे आहेत. युजर्स त्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा गुगल पे च्या वेबसाईटद्वारे उपलब्ध असेल.

अमेरिकेमध्ये गुगल पे बंद होणार असल्याची माहिती समोर येताच भारतातील गुगल पे युजर्सच्या मनामध्ये भारतात देखील गुगल पे बंद होणार असल्याचा संभ्रम होता. मात्र तसं नसल्याची माहिती समोर आली आहे.

News Title – Google Pay News Update

महत्त्वाच्या बातम्या

सासऱ्यांविरोधात लढणार का?; रक्षा खडसेंनी स्पष्टच सांगितलं

शर्मिला ठाकरे अन् अमित ठाकरे उतरले पुण्याच्या रस्त्यावर, केली मोठी मागणी

उद्धव ठाकरेंना धक्का?; ईडीच्या कचाट्यात सापडलेला नेता शिंदे गटाच्या वाटेवर?

रोहित पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप; म्हणाले..

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!