मुलीसाठी शाहीद कपूरने सोडली आवडती गोष्ट; कारण तुम्हालाही अभिमान वाटेल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shahid kapoor | बॉलीवुड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये त्याच्यासोबत कृति सेनन मुख्य भुमिकेत दिसून आली. नुकतीच शाहिदने (Shahid kapoor) नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने अनेक खुलासे केले.

शाहिद आणि त्याची पत्नी मीराला मिशा आणि झैद ही दोन मुलं आहेत. मिशासाठी शाहिदने आपली एक खूप जुनी सवय मोडली असल्याचं त्याने सांगितलं. यासोबतच त्याने अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आणि अनेक खुलासेही केले.

काय म्हणाला शाहिद कपूर?

“मला स्मोकिंग करायची प्रचंड सवय होती. त्यामुळे माझी मुलगी मिशा हिच्यापासून लपवून गुपचूप मी सिगारेट ओढत होतो. एक दिवस जेव्हा मी असंच तिच्यापासून लपून सिगारेट ओढत होतो, तेव्हा मी स्वतःला विचारलं की, हे मी कायम असेच करू शकत नाही. त्याच दिवशी मग मी स्मोकिंग सोडण्याचा निर्णय घेतला.”, असा खुलासा शाहिदने (Shahid kapoor) केला.

पुढे शाहिदला करीना कपूरबद्दलही प्रश्न करण्यात आला. मुंबईत दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात एकेकाळी प्रेमात आकंठ बुडालेले करीना कपूर आणि शाहिद कपूर (Shahid Kapoor) आमनेसामने आल्याचं दिसून आलं.

यावेळी करीनाने शाहिदला एकदम दुर्लक्षित केलं. यावर शाहिद म्हणाला की, जर आम्ही सोबत फोटोशूट केलं असतं तर, त्याबाबत खूप काही लिहिलं गेलं असतं. आम्ही ‘उडता पंजाब’ ची टीम म्हणून तिथे होतो आणि मला त्याचे योग्य प्रतिनिधित्व करायचे होते. यासाठी आम्ही अशा प्रकारे उभे राहिलो, जिथे लोकांना त्यांना हवे तसे फोटो काढता येणार नाहीत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

‘या’ चित्रपटात दिसणार शाहिद कपूर

दरम्यान, अभिनेता शाहिद कपूरच्या (Shahid kapoor) वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो लवकरच TBMAUJ नंतर ‘देवा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत पूजा हेगडे, पावेल गुलाटी आणि कुब्रा सैत दिसणार आहेत. मात्र, त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची निराशा केली आहे. प्रेक्षक चित्रपटाकडे पाठ फिरवत आहेत.

News Title-  Shahid kapoor gave up his smoking habit for daughter Misha

महत्त्वाच्या बातम्या –

सासऱ्यांविरोधात लढणार का?; रक्षा खडसेंनी स्पष्टच सांगितलं

शर्मिला ठाकरे अन् अमित ठाकरे उतरले पुण्याच्या रस्त्यावर, केली मोठी मागणी

उद्धव ठाकरेंना धक्का?; ईडीच्या कचाट्यात सापडलेला नेता शिंदे गटाच्या वाटेवर?

रोहित पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप; म्हणाले..

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!