शेतकरी बांधवांसाठी खुशखबर!; ‘या’ तारखेला तुमच्या खात्यावर जमा होणार 2 हजार रुपये

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) माध्यमातून शेतकऱ्यांना आगामी 16 वा हप्ता लवकरच पदरी पडणार आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आलेली पाहायला मिळत होती. मात्र आता त्यांच्या पदरी सुख येणार आहे. लवकरच 2 हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. याची तारीखही आता समोर आली आहे.

16 वा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात

पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) माध्यमातून हा निर्णय घेतला जाणार असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये 28 फेब्रुवारी 2024 रोजी पैसे येणार आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आतापर्यंत पाणी पाहायला मिळालं होतं. आता त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद मावेनासा झाला आहे. 16 व्या हप्त्याबाबतची माहिती ही पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) अधिकृत संकेतस्थळावर मिळेल.

पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) माध्यमातून सरकार शेतकरी वर्गाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचं काम करताना दिसत आहे. या योजनेच्या माध्यमातून वर्षाला 6 हजार रूपये देण्यात येतात. तर त्यातील चार महिन्याला 2 हजार रूपये शेतकऱ्याच्या अकाऊंटवर पाठवले जातात.

15 वा हप्ता हा 2023 मध्ये देण्यात आला. आता 16 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. हा 16 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्येच शेतकरी बांधवांच्या खात्यात येणार आहे. जर आपल्या खात्यात पैसे न आल्यास आपलं नाव यादीमध्ये आहे का? हे पाहू शकता. यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने हे काम करू शकता.

ऑनलाईन पद्धतीने यादीत नाव पाहता येणार

pmkisan.gov.in या वेबसाईटला जाऊन भेट द्यावी. बेनिफिशियरीमध्ये जावं आणि त्याठिकाणी क्लिक करून वेबसाईटखालील  निवडक (राज्य, जिल्हा, ब्लॉक, गाव) पर्याय निवडावा. त्यानंतर गेट रिपोर्ट यावर क्लिक करावं आणि त्याठिकाणी लाभार्थ्यांची यादी समोर येईल.

बॅनेन्स स्टेट्स मिळवण्यासाठी करा ‘हे’

अधिकृत pmkisan.gov.in संकेतस्थळावर जात फार्मर्स कॉर्नरमध्ये जावून त्यातील बेनिफिशिअरी या पर्यायावर क्लिक करा. आपला आधारकार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँक खाते कॅप्चा कोड टाकावा. त्यानंतर गेट स्टेट्स वर क्लिक करावं आणि त्यानंतर स्क्रिनवर डिटेल्स समोर येतील.

News Title – PM Kisan Yojana Scheme News Update

महत्त्वाच्या बातम्या

सासऱ्यांविरोधात लढणार का?; रक्षा खडसेंनी स्पष्टच सांगितलं

शर्मिला ठाकरे अन् अमित ठाकरे उतरले पुण्याच्या रस्त्यावर, केली मोठी मागणी

उद्धव ठाकरेंना धक्का?; ईडीच्या कचाट्यात सापडलेला नेता शिंदे गटाच्या वाटेवर?

रोहित पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप; म्हणाले..

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!