Women Education | शिक्षण हे मनुष्याला प्रगत बनवत असते. त्यातच घरातील एक मुलगी शिकली की तिचं संपूर्ण कुटुंब प्रगत होते. मात्र, अजूनही मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन (Women Education) दिलं जात नाही. आर्थिक अडचणीमुळे किंवा इतर कारणांनी मुलींना अर्धवट शिक्षण सोडावं लागतं. आता मुलींनीही सक्षम व्हावं, आपल्या पायावर उभं राहावं, यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे.
आता पैशांच्या अभावामुळे मुलींना आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागणार नाही. कारण सरकार आता मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहे. राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. मुलींच्या शैक्षणिक फीबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
शासन मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार
महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरमध्ये बोलताना मुलींच्या शैक्षणिक फीबाबत मोठी घोषणा केली आहे. 1 जून पासून महाराष्ट्रातील ओबीसी आणि व्हिजेएनटी तसेच अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थिनींची 100 टक्के फी राज्य सरकार भरणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व मुलींना फी (Women Education) नसल्यामुळे शिकता येत नाही, असं होणार नाही. मुलींच्या फी साठी आम्ही 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करणार आहोत. महाराष्ट्र सरकारच्या उपसमितीमध्ये याबाबतचा निर्णय झाला असून लवकरच याचा जीआर निघणार आहे. अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
यासोबतच ज्या मुला-मुलींना महाविद्यालयाचे, शासकीय हॉस्टेल मिळालेले नाही अशांना सरकार निर्वाह भत्ता देणार आहे. मेट्रोसिटीत 6 हजार, शहरात 5,300 तर तालुका पातळीवर 3,800 प्रति महिना भत्ता दिला जाणार आहे. विद्यार्थिनींना हा भत्ता थेट डिबीटीद्वारे मिळणार आहे.
पंतप्रधान मोदींकडून विद्यापीठांना ‘इतका’ कोटींचा निधी
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की,”पंतप्रधान नरेंद्र यांनी पीएम उच्चस्तर शिक्षा अभियानाद्वारे (Women Education) देशातील विद्यापीठांना 3 हजार 800 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तर, आता लवकरच महाविद्यालयांना 5 हजार कोटी रुपये जाहीर केले जाणार आहेत.
News Title- Chandrakant Patil big announcement about Women Education
महत्त्वाच्या बातम्या –
सासऱ्यांविरोधात लढणार का?; रक्षा खडसेंनी स्पष्टच सांगितलं
शर्मिला ठाकरे अन् अमित ठाकरे उतरले पुण्याच्या रस्त्यावर, केली मोठी मागणी
उद्धव ठाकरेंना धक्का?; ईडीच्या कचाट्यात सापडलेला नेता शिंदे गटाच्या वाटेवर?