’12th Fail’ फेम विक्रांत मेस्सीच्या घरी चिमूकल्याचं आगमन; गोड फोटो आले समोर

Actor Vikrant Massey Revealed His Son Face

Vikrant Massey | अभिनेता विक्रांत मेस्सी त्याच्या ’12th Fail’ या चित्रपटामुळे अजूनही चर्चेत आहे. यातील अभिनयासाठी त्याला बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार देखील मिळाला. या चित्रपटामुळे विक्रांतचा चाहतावर्ग बराच मोठा झाला आहे. नुकतेच त्याच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

7 फेब्रुवारी रोजी विक्रांतची पत्नी शीतल ठाकूरने एका गोंडस मुलाला जन्म दिला. तेव्हापासून चाहते त्याच्या मुलाची एक झलक पाहण्यासाठी आतुर होते. अखेर विक्रांतने आपल्या लेकाची पहिली झलक दाखवून त्याचं नाव देखील जाहीर केलं आहे.

विक्रांत मेस्सीची पोस्ट

अभिनेता विक्रांत मेस्सीने मुलाच्या जन्माच्या 16 दिवसांनी त्याची पहिली झलक दाखवली आहे. याबाबत त्याने सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. त्याने काही फोटो पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये विक्रांत फिकट गुलाबी रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. तर, त्याच्या पत्नीने देखील फिटक गुलाबी रंगाची साडी घातली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey)

दोघेही या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्यांनी मुलाचं नाव जाहीर केलं आहे. विक्रांतने आपल्या लाडक्या लेकाचं नाव ‘वरदान’ असं ठेवलं आहे. वरदानचा अर्थ आशीर्वाद असा आहे. “कुठल्याही आशीर्वाद पेक्षा कमी नाही….आम्ही त्याचं नाव वरदान ठेवलं आहे.”, असं कॅप्शन त्याने फोटोला दिलं आहे.

विक्रांत मेस्सीचे आगामी चित्रपट

या फोटोला चाहते भरभरून शुभेच्छा देत आहेत. विक्रांतच्या या फोटोवर बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत. विक्रांतला ’12th Fail’ या चित्रपटाने मोठी हाइप मिळवून दिली. त्याच्या भूमिकेचं देखील प्रचंड कौतुक केलं गेलं.

आता तो लवकरच एकता कपूरच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 3 मे 2024 ला प्रदर्शित होणार आहे. यासोबतच ‘सेक्टर36’, ‘फिर आई हसीन दिलरुबा’ या चित्रपटांमध्येदेखील तो दिसणार आहे.

News Title- Actor Vikrant Massey Revealed His Son Face

महत्त्वाच्या बातम्या –

सासऱ्यांविरोधात लढणार का?; रक्षा खडसेंनी स्पष्टच सांगितलं

शर्मिला ठाकरे अन् अमित ठाकरे उतरले पुण्याच्या रस्त्यावर, केली मोठी मागणी

उद्धव ठाकरेंना धक्का?; ईडीच्या कचाट्यात सापडलेला नेता शिंदे गटाच्या वाटेवर?

रोहित पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप; म्हणाले..

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .