बाबर आझमसमोर आक्षेर्पाह नारेबाजी; पाकिस्तानचा माजी कर्णधार भडकला, Video Viral

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Babar Azam | पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत आहे. तो पेशावर झाल्मीच्या संघाचे नेतृत्व करत आहे. या स्पर्धेदरम्यान बाबरला काही अशा चाहत्यांचा सामना करावा लागला, जे बाबरला डिवचण्याचा प्रयत्न करत होते. संबंधित चाहत्यांनी पाकिस्तानच्या माजी कर्णधाराविरोधात नारेबाजी सुरू करताच बाबर संतापला. बाबर आझमचा तो व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो चाहत्यांवर संतापल्याचे दिसते.

पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम PSL मध्ये पेशावर झाल्मीचे नेतृत्व करत आहे. पेशावर झाल्मी आणि मुल्तान सु्ल्तान यांच्यात खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेच्या सामन्यात बाबर आझमला पाहून चाहत्यांनी ‘झिम्बाबर’चा नारा देण्यास सुरुवात केली, त्यानंतर वातावरण तापले आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार भडकला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

‘झिम्बाबर’ची नारेबाजी

बाबर आपल्या टीमसोबत डगआऊटमध्ये बसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. बाबरला पाहताच स्टँडवर बसलेले चाहते घोषणाबाजी करू लागले. हे पाहून बाबर संतापला आणि आधी घोषणा देणाऱ्या लोकांकडे बोट दाखवून त्यांना आपल्याकडे बोलावण्याचा इशारा केला. चाहते इथेही शांत बसत नाहीत, त्यानंतर बाबरने हातात घेतलेली बॉटल फेकून मारण्याचे हावभाव केले.

यानंतरही बाबरच्या चेहऱ्यावर राग दिसतो. मात्र, चाहते गप्प बसत नाहीत आणि ‘झिम्बाबर’चा नारा देत आहेत. मुल्तानमधील मुल्तान क्रिकेट स्टेडियममध्ये ही घटना घडली. मुल्तान सुल्तान विरुद्धच्या सामन्यात पेशावर झाल्मीने 5 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पेशावरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 8 बाद 179 धावा केल्या.

 

Babar Azam संतापला

बाबर आझमचा संघ असलेल्या पेशावर झाल्मीकडून हसिबुल्ला खानने 37 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. याशिवाय बाबर आझमने 31 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना मुल्तान सुल्तानचा संघ 20 षटकांत 174 धावांवर सर्वबाद झाला. पेशावर झाल्मीचा संघ मोठे आव्हान उभे करत असताना बाबरसोबत ही घटना घडली.

मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वातील मुल्तान सुल्तान संघासाठी डेव्हिड मलानने 25 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 52 धावांची सर्वाधिक खेळी केली, मात्र तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.

News Title- Babar Azam lashed out at fans during Pakistan Super League match between Multan Sultans and Peshawar Zalmi, video goes viral
महत्त्वाच्या बातम्या –

हॉटनेसचा तडका अन् मनोरंजन! करीना, तब्बू आणि क्रितीचा ‘क्रू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

रणजी ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान दुर्दैवी घटना; युवा खेळाडूच्या मृत्यूमुळे खळबळ

आमिर खानला ‘त्या’ गोष्टीचा अजूनही होतोय पश्चाताप; मोठा खुलासा करत म्हणाला…

’12th Fail’ फेम विक्रांत मेस्सीच्या घरी चिमूकल्याचं आगमन; गोड फोटो आले समोर

हार्दिक पांड्याबाबत प्रसिद्ध क्रिकेटपटूचं धक्कादायक वक्तव्य, क्रिकेटविश्वात खळबळ