अम्पायरला शिवी देणं खेळाडूला भोवलं; ICC ने सुनावली मोठी शिक्षा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sri Lanka | सामन्यादरम्यान अम्पायरशी वाद घातल्याने श्रीलंकेच्या कर्णधाराच्या अडचणी वाढल्या आहेत. अलीकडेच श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका खेळली गेली. श्रीलंकेने 2-1 असा विजय मिळवला. मात्र, या विजयानंतर त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आयसीसीने श्रीलंकेचा कर्णधार वानिंदू हसरंगावर दोन सामन्यांची बंदी घातली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यादरम्यान हसरंगाने अम्पायरशी गैरवर्तन केले होते आणि या आरोपानंतर तो दोषी सिद्ध झाला आहे.

अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 21 फेब्रुवारी रोजी डंबुला येथे खेळला गेला. या सामन्यानंतर हसरंगाने नो बॉल न दिल्याने अम्पायर लिंडन हॅनिबल यांना फटकारले होते. या प्रकरणानंतर हसरंगाला मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला होता.

ICC ने सुनावली मोठी शिक्षा

तसेच वानिदू हसरंगाला 3 डिमेरिट पॉइंट्सही देण्यात आले होते. गेल्या 24 महिन्यांत त्याचे डिमेरिट गुण वाढून 5 झाले आहेत. आयसीसीच्या नवीन नियमांनुसार त्याचे 5 डिमेरिट गुण दोन सामन्यांच्या बंदीत रूपांतरित झाले आहेत. हसरंगा आता एक कसोटी किंवा दोन वन डे किंवा दोन ट्वेंटी-20 सामने खेळू शकणार नाही.

प्रथम जो सामना खेळला जाईल त्यातून तो बाहेर जाईल. त्यामुळे पुढील महिन्यात श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांमधून हसरंगा बाहेर राहणार आहे. 4 मार्चपासून श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात ट्वेंटी-20 मालिका खेळवली जाणार आहे. हसरंगा 4 मार्च आणि 6 मार्चला होणाऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांचा भाग असणार नाही.

Sri Lanka संघाचा विजय पण…

श्रीलंकेने ट्वेंटी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा 4 धावांनी पराभव केला होता. हा सामना 17 फेब्रुवारीला झाला होता. यानंतर 19 फेब्रुवारीला झालेल्या सामन्यातही विजय मिळवला. श्रीलंकेने हा सामना 72 धावांनी जिंकला. मात्र, गेल्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. अफगाणिस्तानने 21 फेब्रुवारीला खेळलेला सामना 3 धावांनी जिंकला अन् मालिका 1-2 अशी संपली.

श्रीलंकेने 2-1 ने मालिका खिशात घातली असली तर त्यांच्या संघाला आता पुढील दोन सामन्यांमध्ये आपल्या नियमित कर्णधाराच्या अनुपस्थितीत मैदानात उतरावे लागणार आहे. हसरंगा एक स्टार अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे.

News Title- ICC bans Sri Lanka captain Wanindu Hasaranga for two matches for abusing umpire during Sri Lanka vs Afghanistan match
महत्त्वाच्या बातम्या –

बाबर आझमसमोर आक्षेर्पाह नारेबाजी; पाकिस्तानचा माजी कर्णधार भडकला, Video Viral

हॉटनेसचा तडका अन् मनोरंजन! करीना, तब्बू आणि क्रितीचा ‘क्रू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

रणजी ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान दुर्दैवी घटना; युवा खेळाडूच्या मृत्यूमुळे खळबळ

आमिर खानला ‘त्या’ गोष्टीचा अजूनही होतोय पश्चाताप; मोठा खुलासा करत म्हणाला…

’12th Fail’ फेम विक्रांत मेस्सीच्या घरी चिमूकल्याचं आगमन; गोड फोटो आले समोर