वाघामुळे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड मोठ्या अडचणीत!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Gaikwad | काही दिवसांआधी एकनाथ शिंदेंसोबत काही कुख्यात गुंडांचे फोटो व्हायरल होताना दिसत होते. अशातच आता शिदे गटातील आणखी एक आमदार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या उत्तरामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडलेत.

शिवजयंतीच्या दिवशी संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) अडचणीत आले होते. त्यांनी एका स्थानिक वृत्त माध्यमांशी बोलताना याबाबत स्वत: मी 1997 रोजी वाघाची शिकार केली होती. त्याचा दात गळ्यामध्ये बांधला होता. बिपट्या वगैरे तर आपण असेच पळवतो, असं आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) म्हणाले होते. संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांची मुलाखत व्हायरल झाली आणि याबाबत वन विभागाने याची दखल घेतली आहे.

काय म्हणाले संजय गायकवाड ?

बुलढाणा जिल्ह्यातील शिवजयंतीला आमदार संजय गायकवाड उपस्थित होते. त्यावेळी त्यांना एका स्थानिक वृत्त संस्थेने मुलाखती वेळी गळ्यामधील दाताविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले. माझ्या गळ्यामध्ये वाघाचा दात आहे. त्या वाघाची मी 1987 मध्ये मी शिकार केली होती. त्यानंतर त्यांना वाघ होता की बिबट्या तर ते म्हणाले की वाघच बिपट्या वगैरे मी असंच पळवतो. अशा वक्तव्याने संजय गायकवाड आणखी अडचणीत आले आहेत.

मुलाखत व्हायरल

आमदार संजय गायकवाड यांची मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यांनी केलेल्या शिकारीची जोरदार चर्चा आहे. यावर वन विभागाचे अधिकारी जागे झाले आहेत. त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कायद्यानुसार आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला. तो दात जप्त करत प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवला आहे. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर आमदार गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.

कायदेशीर तरतूद

वाघांची संख्या देशामध्ये कमी होत चालली आहे. जर वाघाची शिकार केली तर कायदेशीर तरतूदी लागू होतात. त्याचे अवयव अंगावर बाळगणे हा दखलपात्र गंभीर गुन्हा आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर तीन वर्षांच्या सश्रम कारावास होऊ शकतो.

देशामध्ये वाघाची शिकार करणे हा एक गुन्हा आहे. सेव्ह द टायगर अशा स्लोगनचा वापर करत वाघांचे जतन करत जनजागृती करण्याचे काम वन विभाग करताना दिसते.

News Title – Sanjay Gaikwad News About Tiger Teeth

महत्त्वाच्या बातम्या

उन्हाळ्यात पर्यटनासाठी ‘ही’ ठिकाणे ठरू शकतात बेस्ट ऑप्शन

“ममता बॅनर्जी आता ‘दीदी’ राहिल्या नाहीत, त्या आता ‘काकू’ झाल्या आहेत”

मोहम्मद शमीला खास पुरस्कार; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते सन्मान

अम्पायरला शिवी देणं खेळाडूला भोवलं; ICC ने सुनावली मोठी शिक्षा

बाबर आझमसमोर आक्षेर्पाह नारेबाजी; पाकिस्तानचा माजी कर्णधार भडकला, Video Viral