आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना चॅलेंज, म्हणाले…

Aditya Thackeray | निवडणूक तोंडावर येताच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळते. सध्याचं राजकारण हे गढूळ होताना दिसत आहे, असा आरोप हा विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर होताना दिसत आहे. अनेकदा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं आहे. काही महिन्यांआधी त्यांनी ठाण्यातून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं. आता वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं आहे.

निवडणूक लढण्याबाबत मुख्यमंत्र्यांना आव्हान

मुंबईतील पुलावरून मुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी लक्ष केलं आहे. बेकायदेशीर मुख्यमंत्री म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून वरळी येथे पुलाचे काम पूर्ण झाले असूनही कोणीही तो पुल सुरू करण्यात आला नाही. मात्र आता तो पुल सुरू करण्यात आला आहे. मुंबई विमानतळाकडे जाणारा बांधून पूल तयार आहे. मात्र अद्यापही त्याचे लोकार्पण झालं नाही. वाहतुकीची समस्या असताना अहंकारी मुख्यमंत्र्यांनी पूल उभारला नाही.

आदित्य ठाकरे ट्वीट

“हा डोमेस्टिक जंक्शनवरील विमानतळ असून उड्डाणपुलाला जोडणारा पूल आहे. इथे तासन् तास खांब्यावरील लाईट्स सुरू असतात तर दुसरीकडे मुंबईच्या रस्त्यावर ट्राफिक सुरू आहे. मुलभुत गोष्टींसाठी आपली बाजू मांडत आहे. मात्र निर्लज्ज कार्यकर्ते मुंबईकरांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत”, असं संतापजनक ट्वीट आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलं आहे.

“बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो की त्यांनी त्यांचा अहंकार बाजूला करण्यासाठी हा एमआरडीएला पुल सुरू करण्यासाठी हे विचारलं पाहिजे. बघुयात आता मुख्यमंत्री आपला अहंकार बाजूला करतात का ते?”, असं आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले आहेत.

“गोखले पुलासाठी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा प्रश्न विचारला आहे. मुंबईकरांना हे दोन्ही पुल पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे. जो पुल सध्या बांधून तयार आहे. मात्र उद्घाटन अजूनही तसेच आहे”, असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.


याआधी देखील आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात निवडणूक लढवण्याचं आव्हान केलं होते. त्यानंतर त्यांनी बेकादेशीर मुख्यमंत्री म्हणत टीकेची तोफ डागली आहे.

News Title – Aditya Thackeray challenge to Eknath Shinde About Election

महत्त्वाच्या बातम्या

‘या’ 3 स्कीममुळे व्हाल लखपती; महिन्याला गुंतवा फक्त 500 रुपये

उन्हाळ्यात पर्यटनासाठी ‘ही’ ठिकाणे ठरू शकतात बेस्ट ऑप्शन

“ममता बॅनर्जी आता ‘दीदी’ राहिल्या नाहीत, त्या आता ‘काकू’ झाल्या आहेत”

मोहम्मद शमीला खास पुरस्कार; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते सन्मान

अम्पायरला शिवी देणं खेळाडूला भोवलं; ICC ने सुनावली मोठी शिक्षा