‘खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी…’; जरांगे भडकले

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी ओबीसी प्रवर्गातून सरकार आरक्षण देत नाही, म्हणून (Manoj Jarange Patil) सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातून कोणाला मोठं होऊ दिलं नाही. महादेव जाणकर यांना मोठं होऊ दिलं नाही. त्यांनी अनेकांना संपवले आहे. त्यांचा बामणी कावा माझ्यासमोर चालणार नाही. खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी समोर यावे, कोणाच्या आडून हल्ले करू नये, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे.

गेली पाच महिने झाले तरीही देवेंद्र फडणवीस हे गुन्हे मागे घेत नाहीत. तुम्हाला बळी पाहिजे तर मी माझा बळी देतो. मी सागर बंगल्यावर येतो. यावेळी जरांगे पाटील आक्रमक झाले होते. यावेळी व्यासपीठावर काहीजन आले आणि त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) ऐकायला तयार नाही.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मी जात आंदोलन करणार आहे. यामागे नारायण राणे आणि अजय बारस्कर आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सगेसोयरेची अंमलबजावणी होत नाही. त्यांनी ठरवलं तर ती अंमलबजावणी होईल, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

छत्रपतींच्या खाली बसून सांगतो मी कुठल्याही पक्षाचा नाही, मी सामाजाचा आहे आणि समाजावर माझी निष्ठा आहे. मी केवळ समाजाचं काम करत आहे. कोणीतरी मराठा समाजाला हरवण्याचं स्वप्न बघत आहे. यामुळे छगन भुजबळ यांना देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे अजित पवार यांच्यासोबत जावं लागलं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

मनोज जरांगे पाटील सागर बंगल्याकडे रवाना

मनोज जरांगे पाटील सागर बंगल्याकडे रावाना झाले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर धक्कादायक दावा केला आहे. फडणवीस यांनी ठरवले तर आरक्षणासाठी अंमलबजावणी होईल असं ते म्हणाले आहेत.

सागर बंगल्यावर पोलिसांचा बंदोबस्त

मनोज जरांगे पाटील सागर बंगल्यावर रवाना झाले आहेत. सध्या सागर बंगल्यावर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा पाहायला मिळत आहे. पोलीस सैन्यांनी सागर बंगल्याच्या चारही बाजूला संरक्षण देण्यात आलं आहे.

News Title – Manoj Jarange On The Way Of sagar Bunglow

महत्वाच्या बातम्या

वाघामुळे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड मोठ्या अडचणीत!

“माझ्या सलाईनमध्ये विष टाकून मला मारण्याचा प्लॅन…”; जरांगेंच्या आरोपाने खळबळ

मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर खळबळजनक आरोप!

मुंबईकरांसाठी चिंताजनक बातमी, तहान भागवणारी धरणे आटली

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी; हवामान विभागाचा इशारा