मनोज जरांगे पाटील माघारी फिरले, मराठा बांधवांना केलं महत्त्वाचं आवाहन

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील काल (25 फेब्रुवारी) चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मला मारायचं आहे. त्यांचा सलाईनमध्ये विष घालून मारण्याचा प्लान आहे. त्यामुळे मी सलाईन घेणं बंद केलं आहे. फडणवीस यांचा बामणी कावा माझ्या समोर टिकणार नाही,असे म्हणत जरांगे (Manoj Jarange Patil) मुंबईच्या दिशेने निघाले होते.

मात्र, वाटेतच तब्येत खराब झाल्याने त्यांनी भांबेरी गावात मुक्काम केला. आज सकाळी पुन्हा ते मुंबईकडे निघाले होते. मात्र, पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे. जरांगे पाटील आता परत अंतरवाली सराटीत पोहोचले आहेत. पुढील काही तासांतच ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

मनोज जरांगे पुन्हा फिरकले गावी

जरांगे पुन्हा गावी परतल्याने अंतरवाली सराटीत गर्दी जमण्याची शक्यता आहे. म्हणूनच, संपूर्ण अंबड तालुक्यात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच,कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, स्फोटके सोबत बाळगता येणार नाहीत हे स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

“उपमुख्यमंत्र्याच्या सांगण्यावरून अंबड तालुक्यात संचारबंदी लावण्यात आली आहे. सर्वांनी शांत राहावे पोलिसांना त्रास देऊ नये. अंतरवाली सराटीत बैठक घेऊन पुढील दिशा ठरवू,”,अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. आता जरांगे पाटील पुढे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

दरम्यान, जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे यांनी माझ्याविरोधात खोटे व बिनबुडाचे आरोप केले असून त्यांना मला त्यावर उत्तरही द्यावेसे वाटत नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याप्रमाणे जरांगे हे स्क्रिप्ट का वाचत आहेत?, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करताच राज्यातील भाजप नेत्यांनी जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. “मराठा आंदोलन नेमकं कशासाठी आहे? मराठा समाजासाठी आहे की देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची बदनामी केली जात आहे. फडणवीस यांना टार्गेट केलं जात आहे. सागर बंगल्याकडे चालले आहात. तिथं एक आमची भिंत आहे. ती भिंत पार करा आणि नंतरच सागर बंगल्यावर पोहोचा”,असा इशाराच भाजपचे नेते नितेश राणे यांनी दिला होता.

News Title –  Manoj Jarange Patil Returns To Antarvali Sarati  

महत्त्वाच्या बातम्या –

“सागर बंगल्याबाहेरील मोठी भिंत पार करा…”; नितेश राणेंचं जरांगेंना आव्हान

सदावर्तेंनी शरद पवारांचं नाव घेत केली ‘ही’ मोठी मागणी

‘खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी…’; जरांगे भडकले

आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना चॅलेंज, म्हणाले…

मनोज जरांगे पाटील सागर बंगल्याकडे रवाना!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .