Manoj Jarange Protest | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Protest) यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवरच काही जिल्ह्यांमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
वातावरण तणावपूर्ण होत असल्याने मराठवाड्यातील (Marathwada) तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद (Internet Service Closed) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना बऱ्याच अडचणी होणार आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे.
‘या’ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट आणि एसटी सेवा बंद
कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar), जालना (Jalna) आणि बीड (Beed) या तीन जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तब्बल 10 तास इंटरनेट सेवा बंद असणार आहे.
यासोबतच (Manoj Jarange Protest) छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व आगारातील एसटी बसची वाहतूक तात्पुरती बंद करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांना बराच त्रास होऊ शकतो. आज वाहतूक सुरू होईल की नाही, याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.
संपूर्ण अंबड तालुक्यात संचारबंदी
आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Protest) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर ते मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र, काल रात्री अचानक तब्येत खराब झाल्याने ते भांबेरी गावात मुक्कामी होते.आज सकाळी पुन्हा ते मुंबईकडे निघाले होते. मात्र, पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे. जरांगे पाटील आता परत अंतरवाली सराटीत पोहोचले आहेत.
जरांगे पुन्हा गावी परतल्याने अंतरवाली सराटीत गर्दी जमण्याची शक्यता आहे. म्हणूनच, संपूर्ण अंबड तालुक्यात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच,कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, स्फोटके सोबत बाळगता येणार नाहीत हे स्पष्ट करण्यात आले आहे.
News Title – Manoj Jarange Protest Internet and st bus service stop in Chhatrapati Sambhajinagar Jalna and Beed district
महत्त्वाच्या बातम्या –
मनोज जरांगे पाटील माघारी फिरले, मराठा बांधवांना केलं महत्त्वाचं आवाहन
“सागर बंगल्याबाहेरील मोठी भिंत पार करा…”; नितेश राणेंचं जरांगेंना आव्हान
सदावर्तेंनी शरद पवारांचं नाव घेत केली ‘ही’ मोठी मागणी