“सर्रास गोळीबार, खून, ड्रग्ज..”, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Tejaswini Pandit | राज्यात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत, ज्यावरून कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण केले जात आहेत. यावर मराठी कलाकार रोखठोकपणे आपली भूमिका मांडताना दिसून येतात. आता प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितची (Tejaswini Pandit ) एक पोस्ट चर्चेत आली आहे.

तेजस्विनी पंडितने तिच्या पोस्टच्या माध्यमातून राज्यातील सद्य सामाजिक स्थितीबाबत मोठा सवाल उपस्थित केला आहे. आपला महाराष्ट्र असा कधीच नव्हता, असं म्हणत तिने संताप व्यक्त केला आहे. तेजस्विनीने ट्वीटद्वारे आपलं मत मांडलं आहे.

Tejaswini Pandit ची पोस्ट

“दुष्काळ, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न वर्षानुवर्षे सतावत आहेतच…आता सर्रास गोळीबार, खून, ड्रग्ज….? असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता.” अशी पोस्ट तेजस्विनी पंडितने केली आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट आता चर्चेत आली आहे.

गेल्या काही दिवसांत राज्यात गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या. भाजप आमदाराने तर थेट पोलिस ठाण्यातच गोळीबार केला. यासोबतच पुण्यात सापडलेलं सर्वात मोठं ड्रग्ज रॅकेट या पार्श्वभूमीवर तेजस्विनीने (Tejaswini Pandit ) ही पोस्ट केली आहे.

तेजस्विनीच्या या पोस्टने नेटकऱ्यांचे देखील लक्ष वेधलं आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. निर्भिडपणे आपलं स्पष्ट मत मांडल्याने काही जणांनी तिला पाठिंबा दिला आहे. आपले मत मांडल्यामुळे तिचे कौतुक देखील केले जात आहे.

तेजस्विनी पंडित कायम चर्चेत असते

मागे तेजस्विनीने (Tejaswini Pandit ) केलेली एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली होती. “जनता मूर्ख नाही. सगळं जाणते तसेच बेईमानी ओळखते. ही गोष्ट लक्षात ठेवणे!”, अशी पोस्ट तेजस्विनीने केली होती. तेव्हा तेजस्विनीने आपल्या पोस्टमध्ये कुणाचेच नाव घेतले नव्हते. मात्र, अजित पवार यांच्या बंडावरच तिने भाष्य केल्याचं तेव्हा म्हटलं गेलं.आता पुन्हा एकदा ती अशाच पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

News Title –  Tejaswini Pandit post in discussion 

महत्त्वाच्या बातम्या –

मराठा आंदोलनामुळे तणाव, ‘या’ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट आणि एसटी सेवा बंद

मनोज जरांगे पाटील माघारी फिरले, मराठा बांधवांना केलं महत्त्वाचं आवाहन

“सागर बंगल्याबाहेरील मोठी भिंत पार करा…”; नितेश राणेंचं जरांगेंना आव्हान

सदावर्तेंनी शरद पवारांचं नाव घेत केली ‘ही’ मोठी मागणी

‘खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी…’; जरांगे भडकले