‘या’ गोष्टीत दडलाय सुखी वैवाहिक आयुष्याचा राज!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chankya Niti | आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली धोरणे आजही जीवनामध्ये उपयुक्त पडतात.त्यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांचे पालन केले तर कोणत्याही समस्यातून (Chankya Niti ) बाहेर पडणं अवघड नाहीये. चाणक्य नीती ही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच वैयक्तिक जीवनावर खोलवर परिणाम करते.

आपल्या वैयक्तिक जीवनावरही चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टींचा परिणाम होतो. त्यांच्या तत्वांचे पालन केले तर वैवाहिक जीवनात कोणत्याच अडचणी येणार नाहीत. तसेच वैवाहिक आयुष्य सुखी देखील होईल. कोणत्या चुका केल्या तर, संसार उद्ध्वस्त होतो, याबाबत चाणक्य यांनी अगोदरच सतर्क केले आहे. आता या गोष्टी नेमक्या कोणत्या याची खाली संपूर्ण माहिती दिली आहे.

आचार्य चाणक्य (Chanakya Niti )यांच्या मते पती-पत्नीच्या मधुर नात्यावर कुटुंबातील सुख-शांती अवलंबून असते. ज्या घरात पती-पत्नीच नातं ठीक नसते तिथे अगदी लक्ष्मीही वास करत नाही, असे ते म्हणतात. त्यामुळे सुखी संसार ठेवायचा असेल तर, काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

वैवाहिक जीवनासाठी चाणक्य नीती काय सांगते?

एकमेकांचा आदर-  जिथे लोक एकमेकांचा आदर करत नाहीत तिथे लग्न कधीही टिकत नाही. कारण जिथे आदर नाही तिथे प्रेमाचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे पती आणि पत्नी या दोघांनीही एकमेकांचा आदर करायला हवा.

काळजी करणे– एका सुखी नात्यात एकमेकांची काळजी करणं खूप गरजेचं असतं. काळजी दाखवली तर, प्रेम दिसून येतं. यामुळे प्रेमाची भावना वाढीस लागते. जिथे जोडीदार एकमेकांची काळजी घेत नाहीत ते नाते फक्त नावापुरतेच असते. अशा नात्यात (Chankya Niti )सर्व काही घडते पण प्रेम नसते. त्यामुळे काळजी करायला हवी.

नात्यात निष्ठा असावी- वैवाहिक जीवनात निष्ठा असणे अत्यंत गरजेचं आहे. आजच्या काळात लग्न होऊनही बरेच जण विवाह बाह्य संबंध ठेवतात. यामुळे विश्वास घात होतो.पती-पत्नी दोघांपैकी एकाने विवाहाबाह्य अवैध संबंध ठेवले तर वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होतो. याचा साथीदाराला प्रचंड त्रास होतो.

नात्यात विश्वास असावा- विश्वासावर कोणतेही नाते टिकलेले असते. नात्यात जर एकमेकांबद्दल विश्वासच नसेल तर ते नाते फुलत नाही. सतत शंकाची भावना देखील नात्यात (Chankya Niti ) दुरावा निर्माण करते. त्यामुळे नात्यात विश्वास निर्माण करणे आणि तो कायम राखणे अत्यंत गरजेचं असतं.

पारदर्शकता असावी- नात्यात पारदर्शकता असणे म्हणजेच आपण आपल्या जोडीदाराला प्रत्येक गोष्ट सांगायला हवी. त्याच्यापासून काही लपवून ठेऊ नये. यामुळे नात्यात गैरसमज निर्माण होतात. गैरसमज झाले की, छोट्या गोष्टी देखील मोठ्या भांडणाचे कारण बनते. त्यामुळे या गोष्टी (Chanakya Niti ) लक्षात घेणं आवश्यक आहे.

News Title- Chankya Niti for married life

महत्त्वाच्या बातम्या –

मराठा आंदोलनामुळे तणाव, ‘या’ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट आणि एसटी सेवा बंद

मनोज जरांगे पाटील माघारी फिरले, मराठा बांधवांना केलं महत्त्वाचं आवाहन

“सागर बंगल्याबाहेरील मोठी भिंत पार करा…”; नितेश राणेंचं जरांगेंना आव्हान

सदावर्तेंनी शरद पवारांचं नाव घेत केली ‘ही’ मोठी मागणी

‘खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी…’; जरांगे भडकले