‘ड्रामा क्वीन’ करणार राजकारणात एंट्री?, थेट म्हणाली..

Kangana Ranaut big statement

Kangana Ranaut | अभिनेत्री कंगना रनौतला बॉलीवुडची ‘ड्रामा क्वीन’ म्हटलं जातं. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. नुकतीच तिने ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ग्लोबल च्या दुसऱ्या पर्वाला हजेरी लावली. यावेळी तिने (Kangana Ranaut) आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल मोठं विधान केलं.

त्यामुळे लवकरच कंगना रनौत राजकारणात एंट्री करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रश्नांवर बोलताना कंगनाने मोठा खुलासा केला आहे. तिने आपल्या मनातली गोष्ट जाहीरपणे बोलूनच दाखवली आहे.

काय म्हणाली कंगना रनौत?

“मी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगत आहेत. मात्र, मला जर खरंच लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर हीच योग्य वेळ आहे.”, असे विधान कंगनाने केलं आहे. तिच्या या वक्तव्याची आता जोरदार चर्चा होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

काही महिन्यांपूर्वीच ती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना भेटली होती. कंगनाने नड्डा यांच्यासोबतच्या भेटीचा व्हिडीओही सोशल मिडियावर पोस्ट केला होता. त्यामुळे कंगना (Kangana Ranaut) यंदा निवडणूकीमध्ये सहभाही होणार असल्याची चर्चा होती.

कंगना भाजपकडून लढणार?

त्यातच तिने निवडणुकीत उतरण्याची हीच वेळ असल्याचे म्हणत या चर्चांना अजूनच हवा दिली आहे. तिने जाहीरपणे मनातलं बोलून दाखवल्याने ती नेमकी कोणत्या मतदार संघातून लढणार, इथपर्यंत चर्चा होत आहेत. या कार्यक्रमात तिने अनेक गोष्टींवर चर्चा केली.

RRR किंवा सत्यजीत रे यांचे सिनेमे असोत नाहीतर स्लमडॉग मिलेनिअर, तुम्हाला जर ग्लोबल व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पहिले लोकल व्हावं लागेल. यावर माझा विश्वास आहे. त्यात आपला प्रामाणिकपणा देखील महत्वाचा असतो. आपल्या संस्कृतीवर आणि संघर्षावर आधारित असलेले चित्रपट हे बनायला हवेत. असं कंगना (Kangana Ranaut) म्हणाली.

News Title : Kangana Ranaut big statement about upcoming elections

महत्त्वाच्या बातम्या –

“सर्रास गोळीबार, खून, ड्रग्ज..”, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा घटस्फोट! व्हिडीओ शेअर करत म्हणाली, मला आनंद होत आहे!

शेतकऱ्यांनो सावधान! राज्याच्या ‘या’ भागात हवामान खात्याचा पावसाचा इशारा

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनच्या मुलीबद्दलने नव्याने केला सर्वात मोठा खुलासा!

भाजपसोबत का गेलो?, अजित पवारांनी केला आतापर्यंतचा सर्वांत मोठा खुलासा

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .