‘…तो फडणवीसांचा डाव होता’; आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. यामुळे महाराष्ट्रातील राजकारण सध्या चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. असं असताना आता ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. नितीन देशमुख यांनी जरांगेंना (Manoj Jarange Patil) समर्थन देत फडणवीसांवर आरोप केलेत.

आमदाराच्या दाव्याने खळबळ

जरांगेंच्या आरोपांना समर्थन देत अनिल देशमुख यांनी निश्चितपणे देवेंद्र फडणवीस तसं करू शकतात असं म्हटलंय.  आपण सुरतला असतांना फडणवीसांनी असंच इंजेक्शन देऊन संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नितीन देशमुखांनी केलाय. मला त्यांचा अनुभव आहे. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की, मला मारण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. या आरोपांची चौकशी व्हावी, अशी मागणी नितीन देशमुख यांनी केली आहे.

फडणवीस काहीही करू शकतात. सत्तेचा दुरुपयोग करणे, अत्याचार करणं, हा एकमेव धंदा देवेंद्रजींचा महाराष्ट्रात सुरू आहे. मग तिच्या माध्यमातून इतर पक्षातील लोक फ़ोडत आहेत, असं नितीन देशमुख यांनी म्हटलं आहे.

जरांगे पाटलांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमदार देशमुखांनी केलीय. नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांची शेतकरी संघर्ष पदयात्रा अकोट तालूक्यातील कुटासामध्ये आली होती. यावेळी ते बोलत होते.

Manoj Jarange Patil | जरांगेंचे फडणवीसांवर आरोप?

देवेंद्र फडणवीस मला संपवण्याचा विचार करत आहेत. माझं एन्काऊंटर करण्याचा त्यांचा विचार आहे. मला सलाईनमध्ये विष देण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळे मी परवापासून सलाईन घेणे बंद केले आहे, असे जरांगे म्हणाले होते. जरांगे यांनी रविवारी दि.25 अंतरवाली सराटी येथे मराठा बांधवांशी बोलताना हे आरोप केले होते.

जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया

मनोज जरांगेंच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी अधिक भाष्य करणं टाळलं. मी काही ऐकलंच नाही, मी काही ऐकलंच नाही काय आरोप केलेत, तर काय बोलणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

नाकात पाईप, हातात बँडेज; मोहम्मद शमीचे रूग्णालयातील फोटो आले समोर!

अत्यंत महत्त्वाची बातमी; ‘या’ भागांमध्ये 100 टक्के पाणीकपात

‘मराठी भाषा गौरव दिन’! राज ठाकरेंची लांबलचक पोस्ट; तरूणांना केलं खास आवाहन

व्हॉट्सॲप प्रोफाईल फोटोचा गुपचूप स्क्रिनशॉट घेणाऱ्यांच्या अडचणी वाढणार!