व्हॉट्सॲप प्रोफाईल फोटोचा गुपचूप स्क्रिनशॉट घेणाऱ्यांच्या अडचणी वाढणार!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

WhatsApp | सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp ची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. एकाचवेळी अनेकांशी संवाद साधण्याची मुभा देणारे हे प्लॅटफॉर्म सर्वांनाच भुरळ घालते. WhatsApp च्या माध्यमातून अनेकजण जोडले गेले आहेत. इंस्टाग्राम आणि एक्सच्या तुलनेत WhatsApp ची प्रसिद्धी अधिक आहे. हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नवनवीन अपडेट आणून युजर्संना आकर्षित करत असते. आता WhatsApp चे नवीन अपडेट प्रोफाईल फोटोंचे स्क्रीनशॉट घेण्यास प्रतिबंध करणार आहे.

WhatsApp चे नवीन अपडेट प्रोफाईल फोटोंचे स्क्रीनशॉट घेण्यास प्रतिबंध करेल आणि गोपनीयता आणि काही वैशिष्ट्यांसह अतिरिक्त सुरक्षा प्रदान करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया व्हॉट्सॲपचे नवीन फीचर कसे काम करेल. हे फिचर युजर्संना कसे फायदेशीर ठरणार आहे याबाबत जाणकारांनी भाष्य केले आहे.

स्क्रिनशॉट घेत असाल तर…

खरं तर व्हॉट्सॲपवर प्रोफाईल फोटो लावणे हे सामान्य झाले आहे. पण काही वेळा लोक तुमच्या प्रोफाईल फोटोचा गैरवापर करू शकतात. किंबहुना अनेकदा एखाद्याला दुसऱ्याचा प्रोफाईल फोटो आवडतो मग ते स्क्रीनशॉटचा पर्याय शोधतात आणि फोटो आपल्या गॅलरीत सेव्ह करतात. अशा पद्धतीने स्क्रीनशॉट घेऊन इतरांचा प्रोफाईल फोटो घेतला जाऊ शकतो.

दरम्यान, ज्या व्यक्तीचा प्रोफाईल फोटो स्क्रीनशॉटच्या मदतीने घेतला आहे, त्याला याची माहिती देखील मिळत नाही. आपल्या फोटोचा स्क्रीनशॉट घेऊन त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो अशी भीती अनेकांच्या मनात असते. पण, ही समस्या सोडवण्यासाठी व्हॉट्सॲप नवीन अपडेट आणत आहे.

WhatsApp चे नवीन अपडेट

आतापर्यंत व्हॉट्सॲप प्रायव्हसी फिचर अंतर्गत तुम्ही एखाद्याला तुमचा प्रोफाईल फोटो डाउनलोड किंवा सेव्ह करण्यापासून रोखू शकत होता. मात्र आता एक नवीन फिचर येत आहे. यानंतर युजर्स व्हॉट्सॲप प्रोफाईल फोटोचा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाहीत. या फिचरची बीटा टेस्टिंग सुरू आहे.

जर तुम्ही एखाद्याच्या प्रोफाईल फोटोचा स्क्रीनशॉट कॅप्चर करण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला अलर्ट मिळेल. हे युजर्संना परवानगीशिवाय प्रोफाईल फोटो कॅप्चर करण्यापासून रोखण्यासाठी डिझाइन केले आहे. तसेच स्क्रीनशॉट हा संपूर्ण उपाय असू शकत नाही, कारण लोक WhatsApp प्रोफाईल फोटो घेण्यासाठी इतर फोनचा देखील वापर करू शकतात.

News Title- A new feature is coming to prevent those who secretly take screenshots of WhatsApp profile photos
महत्त्वाच्या बातम्या –

बाबरचा झंझावात! ठरला जगातील दुसरा खेळाडू; फ्रँचायझीकडून महागडी गाडी भेट

“..तर बॉलीवुड इंडस्ट्रीच संपेल”, प्रसिद्ध अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य

‘ड्रामा क्वीन’ करणार राजकारणात एंट्री?, थेट म्हणाली..

मोठी बातमी: मनोज जरांगे पाटील यांच्यावर पोलीस कारवाई होणार?, गृहराज्यमंत्र्यांचे मोठे संकेत

‘या’ गोष्टीत दडलाय सुखी वैवाहिक आयुष्याचा राज!