बाबरचा झंझावात! ठरला जगातील दुसरा खेळाडू; फ्रँचायझीकडून महागडी गाडी भेट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Babar Azam | पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार बाबर आझम क्रिकेटमध्ये जबरदस्त पुनरागमन करत आहे. मागील काही कालावधीपासून धावांसाठी संघर्ष करत असलेल्या बाबरची गाडी रूळावर आल्याचे दिसते. सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्याने शानदार शतक झळकावले. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत त्याच्या प्रभावी कामगिरीची सुरुवात झाली. पीएसएलमध्ये पेशावर झाल्मी संघाचे नेतृत्व करताना बाबर आझमने या वर्षीच्या आवृत्तीत पहिले शतक झळकावून महत्त्वपूर्ण कामगिरी केली.

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एकूण 11 शतकांसह ही उल्लेखनीय कामगिरी करणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 10 पेक्षा जास्त शतके झळकावणारा ख्रिस गेलच्या विक्रमानंतर बाबर आझम हा दुसरा खेळाडू ठरला आहे. ट्वेंटी-20 फॉरमॅटचा बॉस ख्रिस गेलने आपल्या शानदार कारकिर्दीत एकूण 22 शतके झळकावली आहेत.

63 चेंडूत नाबाद 111 धावा

पाकिस्तान सुपर लीगमध्ये इस्लामाबाद युनायटेडविरुद्ध बाबर आझमने 63 चेंडूत नाबाद 111 धावा करत चमकदार कामगिरी केली. या उल्लेखनीय खेळीमुळे पेशावर झाल्मीला 20 षटकांत 5 बाद 201 अशी धावसंख्या गाठता आली. 176.19 च्या स्ट्राईक रेटसह बाबर आझमने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 2 षटकार मारले. शतकी खेळीनंतर बाबरला एक मोठे गिफ्ट मिळाले आहे.

पाकिस्तान सुपर लीगच्या चालू हंगामात बाबर आझमने 151.37 च्या स्ट्राईक रेटने एकूण 330 धावा केल्या आहेत. बाबर आझमने आपल्या शतकाशिवाय दोन अर्धशतकेही झळकावली आहेत. बाबरच्या शतकी खेळीला दाद देताना पेशावर झाल्मीचे मालक जावेद आफ्रिदी यांनी संघाचा कर्णधार बाबर आझमच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला महागडी गाडी भेट देण्याची घोषणा केली आहे. ते बाबरला एमजी कार भेट देणार आहेत.

 

Babar Azam ची शतकी खेळी

बाबरने आतापर्यंत 284 ट्वेंटी-20 सामने खेळले असून त्याच्या नावावर 11 शतके आणि 84 अर्धशतकांसह 10,000 हून अधिक धावांची नोंद आहे. याशिवाय बाबर आझमने पाकिस्तानसाठी 117 वन डे आणि 52 कसोटी सामने खेळले आहेत. वन डे क्रिकेटमध्ये त्याने 19 शतके आणि 32 अर्धशतकांच्या मदतीने 5729 धावा केल्या आहेत. कसोटीत 9 शतके आणि 26 अर्धशतकांच्या मदतीने 3898 धावा केल्या.

दरम्यान, भारतात पार पडलेल्या वन डे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर बाबरला पाकिस्तानच्या कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डात भूकंप पाहायला मिळाला. शाहीन शाह आफ्रिदीकडे ट्वेंटी-20 तर शान मसदूकडे कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

News Title- After Babar Azam scored an unbeaten 111 off 63 balls in the Pakistan Super League, Peshawar Zalmi owner Javed Afridi announced that he would be gifted an MG car
महत्त्वाच्या बातम्या –

“..तर बॉलीवुड इंडस्ट्रीच संपेल”, प्रसिद्ध अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य

‘ड्रामा क्वीन’ करणार राजकारणात एंट्री?, थेट म्हणाली..

मोठी बातमी: मनोज जरांगे पाटील यांच्यावर पोलीस कारवाई होणार?, गृहराज्यमंत्र्यांचे मोठे संकेत

‘या’ गोष्टीत दडलाय सुखी वैवाहिक आयुष्याचा राज!

“सर्रास गोळीबार, खून, ड्रग्ज..”, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत