अत्यंत महत्त्वाची बातमी; ‘या’ भागांमध्ये 100 टक्के पाणीकपात

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mumbai News | मुंबईकरांना आता काही दिवस पाणी जपून वापरावं लागणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (Mumbai News) काही भागांचं 100 टक्के पाणी कपात केलं आहे. त्यामुळे नगरिकांची (Mumbai News) मोठी अडचण वाढणार आहे. उन्हाळा अजून सुरूही झाला नाही, तोच पाणी टंचाईचा प्रश्न उभा ठाकला आहे.

पाणी टंचाईचे कारणही यावेळी मोठे आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे उदंचन केंद्राला सोमवारी (27 फेब्रुवारी) आग लागल्यामुळे मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी, पालिकेने मध्यरात्रीपासून पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईवर जलसंकट

दरम्यान, मुंबई पूर्व उपनगरातील पूर्वेचा भाग, ट्रॉम्बे निम्न स्तरीय जलाशय, ट्रॉम्बे उच्च जलाशय, घाटकोपर निम्न स्तरीय जलाशय तसंच शहर विभागातील एफ दक्षिण व एफ उत्तर गोलंजी, फोसबेरी, राओली, भंडारवाडा या जलाशयातून होणारा पाणीपुरवठा मध्यरात्रीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार आहे.

यासोबतच उर्वरित शहर विभाग (Mumbai News) , पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांमधील पाणी पुरवठ्यामध्ये 30 टक्के पाणी कपात केली जाणार आहे. यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अगोदरच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये पाणीसाठा कमी असल्याने पाणी प्रश्न उभा ठाकला होता. त्यातच आता पाणीपुरवठा करणाऱ्या केंद्रालाच आग लागल्याने यात अजूनच भर पडली आहे.

‘या’ भागाचं 100 टक्के पाणी कपात

एन विभाग : विक्रोळी पूर्व , घाटकोपर पूर्व , सर्वोदय नगर नारायण नगर या भागामध्ये 100 टक्के पाणी कपात केली जाणार आहे.एस विभाग : नाहुर पूर्व, विक्रोळी पूर्व, भांडुप पूर्व येथेही 100 टक्के पाणी कपात केलं जाईल.
एम पूर्व एम पश्चिम विभागमध्ये देखील (Mumbai News) 100 टक्के पाणी कपात होईल.
पश्चिम उपनगर , पूर्व उपनगर उर्वरित महानगर पालिकेच्या शहरी भागमध्ये 30 टक्के पाणी कपात होईल.

News Title- Mumbai News 100 percent water cut in Mumbai  

महत्त्वाच्या बातम्या –

“..तर बॉलीवुड इंडस्ट्रीच संपेल”, प्रसिद्ध अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य

‘ड्रामा क्वीन’ करणार राजकारणात एंट्री?, थेट म्हणाली..

मोठी बातमी: मनोज जरांगे पाटील यांच्यावर पोलीस कारवाई होणार?, गृहराज्यमंत्र्यांचे मोठे संकेत

‘या’ गोष्टीत दडलाय सुखी वैवाहिक आयुष्याचा राज!

“सर्रास गोळीबार, खून, ड्रग्ज..”, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत