मोठी बातमी! ‘या’ जिल्ह्यामध्ये इंटरनेट सेवा बंद

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maratha Reservation | गेल्या काही महिन्यांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं आहे. याचे पडसाद आता राज्यामध्ये पाहायला मिळत आहेत. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये याचे पडसाद उमटू लागले असून यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे ऑनलाईन आर्थिक व्यवहार बंद झाल्याने गंभीर परिस्थिती पाहायला मिळाली आहे. पोलीस प्रशासनही आक्रमक झाले आहेत. (Maratha Reservation)

खासगी आणि सरकारी आर्थिक व्यवहार ठप्प झाला आहे. उद्योजक, व्यापाऱ्यांसह विद्यार्थ्याचं आर्थिक नुकसान झालं आहे. यामुळे आता मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनामुळे मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) एक वेगळं वळण प्राप्त झालं आहे. व्यापाऱ्यांसह इतर सर्वच क्षेत्राला बसला आहे. संभाजीनगर, बीड, जालना या जिल्ह्यांमध्ये पाच तास इंटरनेट सेवा बंद केल्याने आर्थिक कोंडी झाली आहे. (Maratha Reservation)

तीन जिल्ह्यांमध्ये 100 कोटींचं नुकसान 

छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना या तीन जिल्ह्यांमध्ये गेली पाच तास इंटरनेट सेवा बंद असल्याने मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. केवळ संभाजीनगरमध्ये 30 कोटींहून अधिक व्यवहार ठप्प झाला आहे. इंटरनेटमुळे ऑनलाईन आर्थिक व्यवहार बंद झाला आहे. इंटरनेट सेवा सुरू झाल्यानंतर सर्व सेवा सुरळीत झाले आहेत.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे भांबेरीतून पुन्हा अंतरवाली सराटीकडे निघाले. त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. इंटरनेट सेवा बंद करण्यात आले. कोणताही चुकीचा मेसेज पडू नये आणि अफवा पसरू नये हा मूळ इंटरनेट बंदचा उद्देश होता. याचा फटका व्यापारी, उद्योजक, खासगी कार्यालयांना बसला आहे.

इंटरनेट सेवा बंद

बीडमध्ये याआधी जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. यामुळे पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज्ञातांकडून एसटी बस देखील पेटवण्यात आली आहे.

आंदोलन पेटलं होतं तेव्हा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यावेळी जालना – बीड महामार्गावर टायर जाळण्यात आले होते.

News Title – Maratha Reservation Internet service off and financial lose

महत्त्वाच्या बातम्या 

अत्यंत महत्त्वाची बातमी; ‘या’ भागांमध्ये 100 टक्के पाणीकपात

‘मराठी भाषा गौरव दिन’! राज ठाकरेंची लांबलचक पोस्ट; तरूणांना केलं खास आवाहन

व्हॉट्सॲप प्रोफाईल फोटोचा गुपचूप स्क्रिनशॉट घेणाऱ्यांच्या अडचणी वाढणार!

बाबरचा झंझावात! ठरला जगातील दुसरा खेळाडू; फ्रँचायझीकडून महागडी गाडी भेट

“..तर बॉलीवुड इंडस्ट्रीच संपेल”, प्रसिद्ध अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य