‘टिळक-गोखल्यांचं पुणे नशेच्या विळख्यात, याला जबाबदार कोण?’; ठाकरे भडकले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune drug racket | पुणे शहर आता ड्रग्स रॅकेटचं स्थळ बनत असल्याचं म्हटलं जात आहे. पुणे शहरातील ड्रग्स प्रकरणाची चर्चा प्रथम ललित पाटील प्रकरणापासून सुरु झाली. त्यानंतर पुण्यात ड्रग्सचा कारखाना मिळाला. या ड्रग्स कारखान्याचे रॅकेट (Pune drug racket) पंजाबमधून इंग्लंडपर्यंत निघाले.

सांस्कृतिक वारसा असलेल्या या शहरात अशा प्रकरणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच मुळशी पॅटर्नमधील अभिनेते रमेश परदेशी यांनी पुण्यातील वेताळ टेकडीवर नशेत गुंग असणाऱ्या तरुणींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर एकच खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने ‘सामना’मधून सरकारवर निशाणा साधत टीका केली आहे.

“महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण हे सत्ता व पैशांच्या नशेत धुंद झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांचे अस्तित्व दिसत नाही. त्यामुळे राज्यातील तरुण पिढी वेगवेगळ्या अमली पदार्थांच्या जालीम नशेने झोकांड्या खात आहे किंवा नशेच्या बेहोशीत रस्त्यावर पडलेली दिसत आहे,” अशी टीका सामनातून केली आहे.

“महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे वगैरे माहेरघर म्हणून पुणे (Pune drug racket ) प्रख्यात होते. आज तेच पुणे नशेचे माहेरघर बनताना आपण सगळेच फक्त पाहत आहोत. पुण्यातील एक अभिनेते रमेश परदेशी यांनी पुण्यनगरीतील सध्याचे भयावह चित्र समोर आणले आहे. पुण्याच्या वेताळ टेकडीवर दोन कॉलेज तरुणी अमली पदार्थांच्या अतिसेवनाने बेहोश अवस्थेत पडल्याचा व्हिडीओ परदेशी यांनी प्रसिद्ध केला. या व्हिडीओने महाराष्ट्रात सध्या नेमके काय सुरू आहे? पुरोगामी तसेच सामाजिकदृष्टया प्रगत महाराष्ट्र कसा ‘नशेडी’ बनलाय व कॉलेज तरुण या नशेद्वारे आत्मघात करीत असताना सत्ताधारी राजकीय नशेने कसे बेफिकीर बनले आहेत, हे दाहक वास्तव समोर आणले आहे,”अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

“पुण्याचे पालकमंत्री कुठेत?”

पुण्याचे सांस्कृतिक अधःपतन एवढ्या झपाट्याने होत असताना पुण्याचे (Pune drug racket ) पालकमंत्री व त्यांचे राजकीय भालदार-चोपदार कोठे आहेत? की या नशेच्या व्यापारातून त्यांचीही कमाई सुरू झाली आहे? पुण्यात गेल्या आठवडाभरात पोलिसांनी विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्लीत छापा टाकून 3 हजार 500 कोटी रुपये किमतीचे 1 हजार 800 किलो ड्रग्ज जप्त केले. विश्रांतवाडीतील मिठाच्या गोदामात पोलिसांनी छापा टाकून 55 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीमधील एका पंपनीत मेफेड्रोनचे उत्पादन होत होते आणि नेपाळमार्गे इतर देशांत ते पाठवण्यात येत होते. त्याच वेळी सांगलीतील कुपवाड येथूनही 300 कोटी रुपयांचे 140 किलो एमडी ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले.

टिळक, गोखल्यांचे पुणे नशेच्या विळख्यात

मिठाच्या पुड्यांमधून ‘एमडी’ ड्रग्जची विक्री होत असे व या पुड्या पुण्यातील कॉलेज तरुणांना सहज मिळत आहेत. याआधी नाशिकमध्ये ड्रग्जसंदर्भात मोठी कारवाई झाली, पण नाशिकमधील ड्रग्ज व्यापाराचा सूत्रधार ललित पाटील याचे मोठे जाळे पुण्यात आहे व त्याचमुळे तो ससून इस्पितळातून पळून जाऊ शकला. पुणे, (Pune drug racket ) नाशिक, सांगलीसारख्या भागांत हा असा नशेचा विळखा पडला आहे. नाशकातील मोठा तरुण वर्ग नशेच्या अमलाखाली आहे व नाशिक शहरात पान टपऱ्यांवरही नशाबाज पदार्थांची खरेदी होते. त्याविरोधात जागरुक नाशिककरांनी प्रचंड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला. पण तरीही नशेचा विळखा ढिला पडल्याचं दिसत नाही. आता टिळक, गोखल्यांचे पुणेही त्याच नशेच्या विळख्यात तडफडताना दिसत आहे. याला जबाबदार कोण?, असा संतप्त सवाल सामनातून केला आहे.

News Title- samana editorial today on Pune drug racket

महत्त्वाच्या बातम्या –

‘मराठी भाषा गौरव दिन’! राज ठाकरेंची लांबलचक पोस्ट; तरूणांना केलं खास आवाहन

व्हॉट्सॲप प्रोफाईल फोटोचा गुपचूप स्क्रिनशॉट घेणाऱ्यांच्या अडचणी वाढणार!

बाबरचा झंझावात! ठरला जगातील दुसरा खेळाडू; फ्रँचायझीकडून महागडी गाडी भेट

“..तर बॉलीवुड इंडस्ट्रीच संपेल”, प्रसिद्ध अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य

‘ड्रामा क्वीन’ करणार राजकारणात एंट्री?, थेट म्हणाली..