पंकज उधास होते ‘इतक्या’ कोटी संपत्तीचे मालक; आकडा वाचून बसेल धक्का

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pankaj Udhas Death | प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांनी काल (26 फेब्रुवारी) वयाच्या 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ना कजरे की धार ना मोतियों के हार, चांदी जैसा रंग है तेरा, रिश्ता तेरा मेरा, आदमी खिलौना है… अशी सुपरहीट गाणी पंकज उधास (Pankaj Udhas Death) यांनी दिली. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली.

अनेक कलाकारांनी पंकज उधास यांना सोशल मिडीयाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. गेल्या बऱ्याच दिवसांपासून तब्येत खराब असल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, सोमवारी संध्याकाळी पंकज उधास यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला.

पंकज उधास होते ‘इतक्या’ कोटी संपत्तीचे मालक

पंकज उधास यांचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. त्यांना आपल्या करिअरमध्ये पहिले बक्षिस हे लहानपणी 51 रूपये मिळाले. 51 रूपयांपासून सुरूवात आणि थेट आता कोट्यवधी रूपयांचे ते मालक होते. प्रसिद्धीपासून दुर राहूनही पंकज उधास यांच्याकडे कोटींची संपत्ती होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nayaab Udhas (@nayaabudhas)

गायक पंकज उधास (Pankaj Udhas Death ) हे आज कोट्यवधी संपत्तीचे मालक होते. त्यांच्याकडे 24 ते 25 कोटी संपत्ती आहे. ते तब्बल 25 कोटी संपत्तीचे मालक होते. त्यांचे एक यूट्यूब चॅनल देखील होते, या चॅनलच्या माध्यमातून ते मोठी कमाई करत. त्यांचे हजारोंच्या घरात सब्सक्राइबर्स आहेत.

पंकज उधास यांच्या निधनाने शोककळा

यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पंकज उधास हे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असत. या माध्यमातून त्यांनी आपले गायन सुरूच ठेवले होते. त्यांच्या गाण्यांचा चाहता वर्ग आजही टिकून आहे. गजलच्या दुनियेतील बादशाह म्हणून पंकज उधास यांना ओळखले जाते.

दरम्यान, पंकज उधास (Pankaj Udhas Death ) यांचे अंतिम संस्कार आज (27 फेब्रुवारी) दुपारी 3 ते 5 दरम्यान हिंदू स्मशानभूमी, वरळी येथे होणार आहे. पंकज उधास यांचा जन्म 17 मे 1951 रोजी गुजरातमधील जेतपूर येथे झाला. गझल व्यतिरिक्त ते चित्रपटातील गाण्यांसाठीही ओळखले जात होते. 1980 मध्ये ‘आहट’ या गझल अल्बममुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. नंतर त्यांनी ‘नाम’, ‘मुकरार’, ‘तरन्नूम’, ‘महफिल’ अशा अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली.

News Title-  Pankaj Udhas Death

महत्त्वाच्या बातम्या –

‘मराठी भाषा गौरव दिन’! राज ठाकरेंची लांबलचक पोस्ट; तरूणांना केलं खास आवाहन

व्हॉट्सॲप प्रोफाईल फोटोचा गुपचूप स्क्रिनशॉट घेणाऱ्यांच्या अडचणी वाढणार!

बाबरचा झंझावात! ठरला जगातील दुसरा खेळाडू; फ्रँचायझीकडून महागडी गाडी भेट

“..तर बॉलीवुड इंडस्ट्रीच संपेल”, प्रसिद्ध अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य

‘ड्रामा क्वीन’ करणार राजकारणात एंट्री?, थेट म्हणाली..