बीट खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे वाचून थक्क व्हाल!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Benefits of Beetroot | आता उन्हाळा ऋतु सुरू झाला आहे. कोणत्या ऋतुमध्ये कोणती फळे, पालेभाज्या खायला हव्यात, याची माहिती असणे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या शरीराला पोषक तत्त्व मिळायला हवीत. यासाठी आपल्या आहारात सर्व प्रकारची फळे, पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ असायला हवी. त्यातच बीट हे आपल्या जेवणात पाहिजेच.

बीट तुम्ही सॅलड म्हणूनची खाऊ शकता. तसेच बीटचा रस तर खूपच फायद्याचा ठरतो.बीटमध्ये अनेक जीवनसत्त्वे असतात. बीट तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी बनविण्यास मदत करते. यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते.

बीटचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन योग्य राहते आणि त्वचा चमकदार व सुंदर राहते. बीटमध्ये कॅलरीज कमी असतात आणि जीवनसत्त्वे व खनिजे यांसारखे पोषक घटक भरपूर असतात. त्यामुळे बीट खायलाच हवं. आता वसंत ऋतु सुरू झाला आहे. या काळात आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी बीटरूट खायला हवं.

बीट खाण्याचे फायदे

जीवनसत्त्व अ व क, फायबर, सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस, क्लोरिन, आयोडीन, लोह व नैसर्गिक साखर या घटकांनी समृद्ध बीट आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

बीट फोलेटचा उत्कृष्ट स्रोत आहे; जो रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे. त्यामुळे बीट रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. यामुळे बीट (Benefits of Beetroot) नियमित खायला हवे.

बीटमध्ये कमी कॅलरीज असतात, तसेच शून्य फॅट असते. त्यामुळे तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर बीटचा आहारात समावेश करायला हवा. बीटमुळे चरबी कमी होण्यास मदत होते.

बीटरूटमध्ये (Benefits of Beetroot) आढळणारे फायबर पचनासाठी खूप फायदेशीर आहे. बीटरूट पचन क्षमता सुधारीत करते. यामुळे बद्धकोष्ठता टाळून निरोगी पाचन तंत्रास प्रोत्साहन मिळते.

News Title-  Benefits of Beetroot

महत्त्वाच्या बातम्या –

“..तर बॉलीवुड इंडस्ट्रीच संपेल”, प्रसिद्ध अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य

‘ड्रामा क्वीन’ करणार राजकारणात एंट्री?, थेट म्हणाली..

मोठी बातमी: मनोज जरांगे पाटील यांच्यावर पोलीस कारवाई होणार?, गृहराज्यमंत्र्यांचे मोठे संकेत

‘या’ गोष्टीत दडलाय सुखी वैवाहिक आयुष्याचा राज!

“सर्रास गोळीबार, खून, ड्रग्ज..”, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत