‘बिग बॉस’ फेम अब्दू रोजिकला ईडीचा मोठा झटका!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Abdu Rozik Ed | बिग बॉस 16 मध्ये प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा कंटेस्टंट म्हणून अब्दू रोजिकवर त्याच्या जगभरातील चाहत्यांनी आपला जीव ओवाळून टाकला होता. मात्र आता अब्दूवर ईडीने समन्स (Abdu Rozik Ed) बजावले असल्याने अब्दू रोजिक अडचणीत सापडला आहे. त्याचे केवळ तजाकिस्तानच नाहीतर जगभरामध्ये हॉटेल्स आहेत. त्याने आपल्या बिग बॉस शोनंतर भारतात देखील एक रेस्टॉरंट सुरू केलं आहे. (Abdu Rozik Ed)

अब्दूचे देशभरामध्ये मोठ मोठे हॉटेल्स आहेत. आता तेच हॉटेल देशामध्येही पाहायला मिळतात. बुर्गीर हे हॉटेल देशामध्ये अब्दूने सुरू केलं आहे. याची सर्वत्र चर्चा असून त्या रेस्टॉरंटमध्ये इतर काही कंपन्यांनी त्यामध्ये पैसे गुंतवले होते. गुंतवलेल्या कंपन्यांपैकी काही कंपन्या या ड्रग्जचा वापर करणाऱ्या आहेत, अशी चर्चा आहे. म्हणून अब्दू रोजिकला ईडीने समन्स (Abdu rozik Ed) बजावले आहे. (Abdu Rozik Ed)

देशामध्ये बुर्गीर रेस्टॉरंट

अब्दू रोजिकवर ईडीने समन्स बजावले असून मनी लाँड्रिंग प्रकरणात त्याला एक साक्षीदार म्हणून बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अब्दू हा गायक असून तो एक व्यवसायिक आहे. त्यामुळे त्याच्या बुर्गीर या रेस्टॉरंटमध्ये काही कंपन्यांनी गुंतवणूक केली असून त्या कंपन्या ड्रग्जचा व्यवहार करते, अशी माहिती समोर आली आहे.

अब्दू रोजिक हा बिग बॉस 16 चा कंटेस्टंट होता. तो बिग बॉस शोचा जीव होता. केवळ गायक म्हणून त्याची चर्चा नव्हती तर तो एक चांगला व्यवसायिक होता. बिग बॉस शोमुळे अब्दू रोजिकला स्टारडम मिळालं आहे. अजूनही तो आपल्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

अब्दू रोजिकची पडत्या काळामध्ये अवघड परिस्थिती होती. सोशल मीडियावर त्याचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यामध्ये तो बाजारामध्ये गाणं गात पैसे मागताना दिसत आहे. अब्दूची उंची त्याच्या प्रसिद्धीसाठी सकारात्मक बाब आहे. लहान वयातच त्यानं मोठं नाव कमावलं असून त्याचे काही म्युझिक अल्बम समोर आले आहेत.

शिव ठाकरे अडचणीत

बिग बॉसमध्ये अब्दू आणि शिव यांच्या जोडीची सर्वत्र चर्चा होती. तसेच यामध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये शिव ठाकरेचंही नाव समोर आलं असल्याची माहिती समोर आली आहे.

News Title – Abdu Rozik Ed news Update

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेत राडा; आशिष शेलारांनी जरांगेंना सुनावलं, म्हणाले ‘एवढी हिंमत आली कुठून’

‘जरांगेंचा बोलविता धनी कोण?’, देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

‘टिळक-गोखल्यांचं पुणे नशेच्या विळख्यात, याला जबाबदार कोण?’; ठाकरे भडकले

मनोज जरांगेंच्या अडचणीत वाढ; सरकारने थेट घेतला ‘हा’ मोठा निर्णय

धक्कादायक! प्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सरची पतीने केली हत्या