वसंत मोरे शरद पवार गटात जाणार?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Pawar | गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील राजकारण हे वेगळ्याच वळणावर गेलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला जाताना दिसत आहेत. तर मनसेचे पुणे दौरे सुरू आहेत. काही दिवसांआधी मनसे विद्यार्थी सेनेचा मोर्चा होता, त्यामध्ये शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी विद्यार्थी मोर्चात सहभाग घेतला होता. तर दुसरीकडे आता मनसेचे वसंत मोरे शरद पवार (Sharad Pawar & Vasant More) यांच्या भेटीला गेले आहेत.

वसंत मोरे शरद पवारांच्या भेटीला

वसंत मोरे (Sharad pawar & vasant More) आणि मनसे यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा आहेत. काही दिवसांपासून वसंत मोरे यांच्या ऐवजी साईनाथ बाबर यांना वरच्या पदावर नियुक्त करायचं आहे. त्यांना दिल्लीत पाठवले तर दुधामध्ये साखर पडेल. यामुळे मनसेमध्ये साईनाथ बाबर यांचा दावा अधिक मजबूत झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला वसंत मोरे यांच्यावर नाराजीचा सूर आहे.

मनसे नेते वसंत मोरे आणि साईनाथ बाबर या दोघांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे. मात्र शर्मिला ठाकरे यांच्या बोलण्यातून साईनाथ बाबर यांना हिरवा कंदील दिला आहे. अशातच वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar & Vasant More) यांची भेट घेतली आहे. यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

vasant more, sharad pawar, mns leader vasant more meet sharad pawar

वसंत मोरे मनसेला राम राम करत शरद पवार (Sharad Pawar & Vasant More) यांच्या पक्षामध्ये जाणार का? असा सर्वांना सवाल आहे. आता स्वत: वसंत मोरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. शरद पवार (Sharad Pawar & Vasant More) यांच्या भेटीनंतर ते म्हणाले की, आपण नाराज असल्याच्या बातम्या माध्यमांमधून येताना दिसत आहेत, मात्र माझ्या चेहऱ्यावर कोणतीही नाराजी दिसते का? असा सवाल त्यांनी केला आहे. ही राजकीय भेट नसल्याचं वसंत मोरे म्हणाले आहेत.

काय म्हणाले वसंत मोरे?

शरद पवार यांच्या भेटीनंतर वसंत मोरे यांनी माध्यमाशी बोलत असताना म्हणाले की आजची राजकीय भेट नव्हती ही भेट मतदारसंघातील कामासंबंधीत होती. माध्यमातून मी नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. पण आपल्या चेहऱ्यावर नाराजी दिसतेय का? असा सवाल वसंत मोरे यांनी केला आहे.

त्यानंतर मोरे म्हणाले की, मी शरद पवार यांच्या भेटीसाठी आलो होतो. माझा विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. त्यामध्ये खडकवासला मतदारसंघाचा समावेश आहे. या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील नऊ एकर जमीन क्षेत्राबाबत आरक्षित प्लॉट आहे. त्यासाठी माझ्या संघटनेचं पत्र देण्यासाठी आलो होतो असं वसंत मोरे म्हणाले होते.

News Title – Sharad Pawar vasant More Meet pune news 

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरलं! मित्राला संपवून व्हिडीओ काढला अन्…

विधानसभेत राडा; आशिष शेलारांनी जरांगेंना सुनावलं, म्हणाले ‘एवढी हिंमत आली कुठून’

‘जरांगेंचा बोलविता धनी कोण?’, देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

‘टिळक-गोखल्यांचं पुणे नशेच्या विळख्यात, याला जबाबदार कोण?’; ठाकरे भडकले

मनोज जरांगेंच्या अडचणीत वाढ; सरकारने थेट घेतला ‘हा’ मोठा निर्णय