जरांगे विरूद्ध फडणवीस वाद आणखी वाढणार?; जरांगेंचा पुन्हा गंभीर इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarnge Patil | मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव एकवटला आहे. मात्र आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  यांच्यावर मराठा बांधवांनीच आरोप केले आहेत. मराठा समाजाचं जरांगे यांनी वाटोळं केलं आहे. यामागे शरद पवार आणि रोहित पवार यांची मदत आहे, असा धक्कादायक दावा संगीता वानखेडे यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आता उपोषण मागे घेतलं आहे. ते उपचारासाठी संभाजीनगरमध्ये गेले. त्यावेळी उपोषणस्थळावरील मंडप पोलीस प्रशासनाकडून  काढण्यात येण्याचं काम सुरू होतं, अशी माहिती समोर आली आहे. (Manoj Jarange Patil)

“मंडपाला हात लावल तर याद राखा”

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी संभाजीनगरमध्ये जात उपचार घेण्यास सुरू केले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा उपोषणस्थळील मंडप काढण्यात आला. यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी आता उपचार घेण थांबवलं आहे. यावेळी त्यानी मंडपाला हात लावला तर याद राखा, असा इशारा पोलीस प्रशासनाला दिला आहे.

आंदोलनाचा मंडप काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या. यावरून आता मनोज जरांगे यांनी मंडपाला हात लावला तर याद राखा असा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी जेलमध्ये सडायला तयार आहे, पण अंतरवालीतील कापड काढू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. अद्याप तरी मंडपाला हात लावणार नाही असं पोलिसांनी माहिती दिली आहे. एकाही कापडाला हात लावला तर तसेच शिवरायांच्या मुर्तीला हात लावला तर महागात पडेल. मनोज जरांगे यांच्या मागे जर कोणी राजकीय डाव केला तर उघडं पाडू असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

तसेच कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे. मला पाठिंब्याचा कुणाला फोन आलेला नाही. कोणाचेच फोन आलेले नव्हते. एसआयटी चौकशी करणार असला तर फेसकॉलवर कोण काय काय बोललं ते खुलं करतो, असं मनोज जरांगे म्हणाले. यामुळे राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये वाद आणखी पेटणार असल्याची चर्चा आहे.

वाद आणखी पेटणार?

मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा मला प्लान आहे असं वक्तव्य केलं होतं. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी मराठा समाजासाठी काय केलं आहे ते महाराष्ट्राला माहिती आहे. मला बोलायचं नव्हतं, मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. ते सुप्रीम कोर्टामध्येही टिकलं होतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन चालवणार आहेत. मी केवळ समाजासाठी काम करत आहे. मला सध्या आतापर्यंत तुमचेच फोन आले आहेत. मी सलाईन उचलून चौकशीला येतो, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

News Title – Manoj Jarange Patil News Update

महत्त्वाच्या बातम्या

वसंत मोरे शरद पवार गटात जाणार?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

‘बिग बॉस’ फेम अब्दू रोजिकला ईडीचा मोठा झटका!

बीट खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे वाचून थक्क व्हाल!

पंकज उधास होते ‘इतक्या’ कोटी संपत्तीचे मालक; आकडा वाचून बसेल धक्का

दिवंगत सिद्धू मुसेवालाची आई देणार बाळाला जन्म!