माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याचा मृत्यू!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rajiv Gandhi | देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी निर्दोष सुटलेला दोषी संथन याचा बुधवारी मृत्यू झाला. चेन्नईच्या राजीव गांधी जनरल हॉस्पिटलमध्ये बुधवारी सकाळी संथनने अखेरचा श्वास घेतला. सकाळी 7.50 वाजता संथनचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (Rajiv Gandhi Assassination Convicts Santhan Die) त्याला क्रिप्टोजेनिक सिरोसिसचा त्रास होता. माहितीनुसार, 27 जानेवारी रोजी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

संथन उर्फ ​​सुतेंथीराजा याला गंभीर अवस्थेत राजीव गांधी शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. 55 वर्षीय संथनला तिरुची येथील महात्मा गांधी मेमोरियल सरकारी रुग्णालयातून रेफर करण्यात आले. राजीव गांधी हत्येप्रकरणी ज्यांना यापूर्वी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती त्या सहा दोषींपैकी तो एक होता.

चेन्नईतील रूग्णालयात अखेरचा श्वास

2022 मध्ये सुटकेचा आदेश दिल्यानंतर त्याने घरी परतण्यासाठी विनंती करणारे पत्रही लिहिले होते. 11 नोव्हेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सहा दोषींना सोडण्याचे आदेश दिले होते. आदेशानंतर दुसऱ्याच दिवशी नलिनी, श्रीहरन, संथन, रॉबर्ट पायस, जयकुमार आणि रविचंद्रन यांची तब्बल 32 वर्षांनी तुरुंगातून सुटका झाली.

नलिनी आणि रविचंद्रन यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती, परंतु उर्वरित चौघांना मध्यवर्ती कारागृहातील विशेष शिबिरात ठेवण्यात आले होते. हे चौघेही श्रीलंकेचे नागरिक असल्याने असे करण्यात आले. त्यानंतर संथनने त्रिची तुरुंगातील विशेष शिबिरातील त्याच्या सेलमधून एक खुले पत्र लिहिले होते.

Rajiv Gandhi यांच्या मारेकऱ्याचा मृत्यू

संथनने या पत्रात त्याने आपल्याला सूर्यप्रकाशही दिसत नसल्याचे म्हटले होते. पत्राद्वारे त्याने जगभरातील तमिळांना आवाज उठवण्याचे आवाहन केले होते जेणेकरून ते त्यांच्या देशात परत जातील. चेन्नईतील परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाने मागील शुक्रवारी संथन उर्फ ​​सुथेनथिराजाला श्रीलंकेत परतण्याची परवानगी देणारा आदेश जारी केला होता, परंतु आजारपणामुळे तो जाऊ शकला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, संथनचे शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह श्रीलंकेला पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक कायदेशीर व्यवस्था सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. संथनला 27 जानेवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याआधी सुटकेनंतर तो तिरुचिरापल्ली येथे राहत होता.

News Title- Former Prime Minister Rajiv Gandhi’s assassin Santhan died in a hospital in Chennai
महत्त्वाच्या बातम्या –

बुमराहची एन्ट्री! स्टार खेळाडूला विश्रांती; अखेरच्या सामन्यासाठी टीम इंडियात मोठा बदल

विराट कोहलीनंतर त्याचा मित्रही झाला ‘बाबा’, चिमुकल्या परीचं आगमन

आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात; प्रियकरासोबत घेणार सातफेरे

गाडी अडवली म्हणून अभिनेत्रीने होमगार्डचे कपडे फाडले, फोन हिसकावला; गुन्हा दाखल

“मनोज जरांगे कोणाला माहित नव्हता, आज तो शरद पवारांचा बाप झालाय”