अत्यंत धक्कादायक! शालेय पोषण आहारात चक्क मेलेल्या उंदराचे अवशेष

Akola news | अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अकोल्यामधील (Akola news) महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार केले जात आहेत. शाळेतील पोषण आहार खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली आहे.

शालेय खिचडीमध्ये चक्क मेलेल्या उंदराचे अवशेष आढळले आहे. यामुळे 10 मुलांना विषबाधा झाली आहे. अकोला शिवसेना वसाहतमधील शाळा क्रमांक 26 मध्ये असलेल्या महानगर पालिकेच्या शाळेत हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

अकोल्यात धक्कादायक घटना

शाळेतील पोषण आहार खाल्ल्यावर विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.

राज्यात जवळपास सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. मात्र हा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचं आता सिद्ध झालं आहे. अकोला (Akola news) शहरातील महानगर पालिकेच्या शाळेतील हा प्रकार गंभीर असून, यामुळे अनेक प्रश्न केले जात आहेत.

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ

शाळेतील पालकांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केल्याचा हा प्रकार असल्याचा आरोप आता केला जात आहे. आता या प्रकरणी पालिका विभाग आणि शालेय शिक्षण विभागावर कारवाई करण्याची मागणी देखील केली जात आहे.

झालेला प्रकार (Akola news) अतिशय गंभीर आणि किळसवाणा असल्याने यावर संताप व्यक्त केला जात आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. या प्रकरणाची आता राज्यभर चर्चा रंगली आहे.

News Title-  Akola news 10 students poisoned in Municipal Corporation School

महत्त्वाच्या बातम्या –

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याचा मृत्यू!

बुमराहची एन्ट्री! स्टार खेळाडूला विश्रांती; अखेरच्या सामन्यासाठी टीम इंडियात मोठा बदल

विराट कोहलीनंतर त्याचा मित्रही झाला ‘बाबा’, चिमुकल्या परीचं आगमन

आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात; प्रियकरासोबत घेणार सातफेरे

गाडी अडवली म्हणून अभिनेत्रीने होमगार्डचे कपडे फाडले, फोन हिसकावला; गुन्हा दाखल