टीम इंडियासाठी वाईट बातमी; ‘हा’ खेळाडू हॉस्पिटलमध्ये दाखल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND vs ENG | इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यापूर्वीच टीम इंडियाचं (IND vs ENG ) टेंशन वाढलं आहे. कारण भारताचा अजून एक खेळाडू आता हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माची देखील चिंता वाढणार आहे.

अगोदरच भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. दुखापतीच्या कारणास्तव त्याने आयपीएलच्या आगामी हंगामातून माघार घेतली आहे. वन डे विश्वचषकात चमकदार कामगिरी केल्यापासून शमी क्रिकेटपासून दूर आहे. आता अजून एक खेळाडू लंडनमधील हॉस्टिपलमध्ये दाखल होणार असल्याने टीम इंडियाच्या चिंतेत भर पडली आहे.

के.एल.राहुलवर लंडनमध्ये उपचार

दुखापतीच्या कारणामुळे भारतीय टीमचा सलामीवीर केएल राहुल इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचसाठी मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तो उपचारासाठी लंडनला असल्याची माहिती समोर आली आहे. तिथे तो त्याच्या क्वाड्रिसेप्स दुखापतीबाबत तज्ज्ञ डॉक्टरांना भेटणार असल्याचं सांगण्यात येतंय.

राहुल हा भारतीय टीममध्ये विकेटकिपर व बॅट्समन अशी दुहेरी भूमिका पार पाडतो. आता त्याच्या अनुपस्थितीने रोहित शर्माची चिंता वाढली आहे. राहुल आयपीएलमध्ये खेळणार का, यावरही प्रश्नचिन्ह केले जात आहेत. तो आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्स टीमचा कॅप्टन आहे.

आता उपचार करुन राहुल लंडन येथून केव्हा परत येणार, हे अद्याप समोर आलं नाही. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG ) पाचव्या आणि शेवटच्या मॅचमध्ये तो खेळणार की नाही, याबाबत स्पष्ट कळलं नाहीये. सीरिजमधील शेवटची टेस्ट मॅच 7 ते 11 मार्च दरम्यान होणार आहे.

इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना कधी होणार?

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील शेवटची कसोटी 7 मार्चपासून धर्मशाला येथे खेळवली जाणार आहे. या सामन्यामध्ये काही खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. बुमराहला रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीतून विश्रांती देण्यात आली होती. आता बुमराह जर परतला तर रोहित शर्मालाही विश्रांती दिली जाईल का? याबाबत काहीही स्पष्ट माहिती नाही पण बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन याबाबत विचार करू शकतात. कारण, रोहितला आयपीएल 2024 मध्येही खेळायचं आहे. अशा स्थितीत भारतीय कर्णधारालाही विश्रांती दिली जाऊ शकते.

News Title- IND vs ENG KL Rahul in London due to injury

महत्त्वाच्या बातम्या –

मनोज जरांगे पाटील संतापले, मराठ्यांना केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन

गौतमी पाटील ‘या’ पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार?

अत्यंत धक्कादायक! शालेय पोषण आहारात चक्क मेलेल्या उंदराचे अवशेष

मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स लावत काँग्रेसचा प्रचार!

संकष्टी चतुर्थीचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरेल अत्यंत शुभ!