मनोज जरांगे पाटील संतापले, मराठ्यांना केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सागर बंगल्यावरून परतल्यानंतर त्यांनी उपोषण सोडत उपचारासाठी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीहून संभाजीनगरमध्ये धाव घेतली आणि उपचार घेतले, त्यानंतर अंतरवाली सराटीतील मंडप काढण्याची बातमी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना समजताच ते उपचार सोडून पुन्हा एकदा अंतरवाली सराटीकडे परतले. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा निर्धार धरला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता त्यांनी संताप व्यक्त केला आहे. अंतरवाली सराटीमध्ये काही दिवसांआधी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यामुळे मराठा नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर सरकारने अंतरवालीतील उपोषणस्थळावरील मंडप काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे पुन्हा संतापले आहेत. त्यांनी आता याविरोधात राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि राज्यापाल यांना मेल करायला लावले आहेत.

मनोज जरांगेकडून मेल करण्याचं आवाहन

अंतरवाली सराटीमध्ये मंडप काढण्यासाठी सरकारकडून दडपशाही सुरू आहे. दडपशाही थांबवा आणि सगेसोयरे यांची अंमलबजावणी करा. अशा आशयाचे मेल राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना करा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलं आहे. मला अटक झाली तरीही मला तुरूंगात आमरण उपोषण सुरू राहणार आहे.

मी भांडलो मराठ्यांसाठी लहान मोठा मराठा, 96 कोळी मराठा, 92 कोळी मराठा, व्यावसायिकांसाठी मी भांडलो, मी बोललो नेत्याला पण राग आला मराठ्यांच्या नेत्यांना, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. गोरगरीब मराठ्यांनी तुला आमदार केलं, मतदान केलं आणि मंत्री केलं. यामुळे आज सर्व आमदारांची जबाबदारी आहे की तुम्ही जातीच्या बाजूने बोलायला हवं होतं, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

“असले चाळे बंद करा”

अंतरवाली सराटीतील उपोषणस्थळावरील मंडप काढण्याचं काम सुरू आहे. याविरोधात आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. या मंडपाला काढून फेकण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. हा अंतरवाली सराटीचा मंडप नाही हा मराठ्यांच्या अस्मितेचा मंडप आहे. यामुळे सर्व मराठा एकवटले आहेत. खासकरून गृहमंत्र्यांना सांगणं आहे की हे चाळे बंद करा, असं ते म्हणालेत.

मंडपाजवळ कापाकापी सुरू नाही, दहशतवाद्यांची लेकरे नाहीत, दडपशाही बंद करा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला केलं आहे.

News Title – Manoj Jarange Patil Maratha Reservation News Update

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगेंनी उचललं मोठं पाऊल

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने दिली गुड न्यूज

बाबा रामदेव यांना न्यायालयाचा ‘सर्वोच्च’ दणका; पतंजली कंपनीला फटकारले, राजकारण तापलं

‘अंकितासोबत लग्न…’; विकी जैनचा धक्कादायक खुलासा

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याचा मृत्यू!