छत्रपती संभाजीनगर | मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आज मोठी घोषणा केली आहे. मराठा आंदोलन 3 मार्चपर्यंत स्थगित करण्यात येत असून, तोपर्यंत फक्त धरणे आंदोलन केलं जाणार आहे, असं त्यांनी म्हटलंय. रुग्णालयात उपचार घेत असतांना जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलन स्थगित करत असल्याचं सांगितलंय.
मनोज जरांगेंनी उचललं मोठं पाऊल
पुढील आठ दिवस मराठा समाजाने शांत राहावे आणि सरकार काय करत आहेत हे पाहावे. तसेच, महाराष्ट्रातील मराठा समाजाला सांगतो आपल्यात चलबिचल नको, आपली ओबीसीमधून आरक्षणाची मागणी आहे, असंही मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले आहेत.
“जेलमध्ये टाकले तरी मी हटणार नाही”
मी 10 टक्के आरक्षण स्वीकारणार नाही, अटक करून जेलमध्ये टाकले तरी मी हटणार नाही. मी जेलमध्ये देखील आमरण उपोषण करेल. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय माघे हटणार नाही, असं जरांगे म्हणालेत.
मी बोललो देवेंद्र फडणवीस यांना, मात्र याचा राग मराठ्यांच्या नेत्यांना आला. मराठा नेत्यांना जात की नेता हवा आहे, असा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केला. जातीने मतदान केले म्हणून तुम्हाला नेत्यांनी जवळ केले. तुमच्या स्वार्थासाठी मराठ्यांच नुकसान करू नका. यांनी मला अटक केली तरीही मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावं, असंही जरांगे म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या कित्येक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगेंनी (Manoj Jarange Patil) देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. या सगळ्या प्रकरणी आता सर्वत्र पडसाद उमटू लागले आहेत.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही याप्रकरणी एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने दिली गुड न्यूज
बाबा रामदेव यांना न्यायालयाचा ‘सर्वोच्च’ दणका; पतंजली कंपनीला फटकारले, राजकारण तापलं
‘अंकितासोबत लग्न…’; विकी जैनचा धक्कादायक खुलासा
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याचा मृत्यू!
बुमराहची एन्ट्री! स्टार खेळाडूला विश्रांती; अखेरच्या सामन्यासाठी टीम इंडियात मोठा बदल