बाबा रामदेव यांना न्यायालयाचा ‘सर्वोच्च’ दणका; पतंजली कंपनीला फटकारले, राजकारण तापलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baba Ramdev | बाबा रामदेव यांची कंपनी असलेल्या पतंजली आयुर्वेदाच्या भ्रामक औषधांच्या जाहिरातींवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी बंदी घातली. खरं तर गेल्या वर्षी न्यायालयाने कंपनीला अशा जाहिराती न देण्याचे निर्देश दिले होते. कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यावर न्यायालयाने कंपनी आणि व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना अवमानाची नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पतंजली कंपनीकडून सांगण्याते आले की, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत आहोत. त्याच्या सूचनांचे पालन करू.

इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) 17 ऑगस्ट 2022 रोजी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यात म्हटले आहे की, पतंजलीने कोविड लसीकरण आणि ॲलोपॅथी विरोधात नकारात्मक प्रचार केला. त्याच वेळी त्यांनी स्वतःच्या आयुर्वेदिक औषधांनी काही रोग बरे करण्याचा खोटा दावा केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 मार्च रोजी होणार आहे.

पतंजली कंपनीला फटकारले

न्यायमूर्ती हिमा कोहली आणि अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने म्हटले की, पतंजली आपल्या औषधांमुळे काही आजार बरे होतील, असे दिशाभूल करणारे दावे करून देशाची फसवणूक करत आहे. याशिवाय याबाबत कोणताही ठोस पुरावा त्यांच्याकडे नाही. पतंजली ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहिराती) कायद्यामध्ये निर्दिष्ट केलेल्या रोगांवर उपचार करण्याचा दावा करणारी त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करू शकत नाही, असे आदेश न्यायालयाने दिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राजकारण देखील चांगलेच तापले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पतंजली प्रकरणाचा दाखला देत सरकारला लक्ष्य केले. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, ‘सगळ्या देशाला तुम्ही गंडा घालताय, सरकार डोळे बंद करून बसलं आहे.’ हे सुप्रिम कोर्टाचे शब्द आहेत. न्यायालयाने पतंजली आयुर्वेदच्या फसव्या जाहिराती पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत शिवाय सरकारच्या अनास्थेवरही नाराजी व्यक्त केली आहे.

 

Baba Ramdev यांच्यावर निशाणा

तसेच उठसूठ प्रत्येकाला देशभक्तीचे आणि भारतीय संस्कृतीचे प्रमाणपत्र वाटणाऱ्या सरकार आणि रामदेव बाबांना लगावलेली ही चपराक आहे. संस्कृतीच्या नावाने लोकांची फसवणूक करायची, सरकारने लोकांचा पैसा आणि साधनसंपत्ती यांना आंदण म्हणून द्यायची हे यांचे विकासाचं मॉडेल आहे. आपला देश अशाच बुवाबाबांच्या हातात गेला तर आयुर्वेदाच्या नावाने लोकांना लुबाडल्याबरोबरच लोकांच्या शरीराची वाताहत होईल आणि देशही देशोधडीला लागेल, असेही आव्हाडांनी नमूद केले.

जितेंद्र आव्हाड आणखी म्हणाले की, बाबा रामदेव यांचे पंतप्रधानांपासून विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यासोबत फोटो आहेत, त्यामुळे सुप्रिम कोर्टाने सांगूनही सरकर त्यांच्याविरूद्ध कोणतीही कारवाई करेल का, याविषयी शंकाच आहे. ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, हे कार्ल मार्क्सचे वाक्य भारताच्या बाबतीत तंतोतंत खरं होताना दिसत आहे.

News Title- Supreme Court has reprimanded Baba Ramdev and banned Patanjali Ayurveda from advertising misleading medicines
महत्त्वाच्या बातम्या –

‘अंकितासोबत लग्न…’; विकी जैनचा धक्कादायक खुलासा

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याचा मृत्यू!

बुमराहची एन्ट्री! स्टार खेळाडूला विश्रांती; अखेरच्या सामन्यासाठी टीम इंडियात मोठा बदल

विराट कोहलीनंतर त्याचा मित्रही झाला ‘बाबा’, चिमुकल्या परीचं आगमन

आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात; प्रियकरासोबत घेणार सातफेरे