‘अरे ही तर पॉर्न किंगची बायको..’, प्रसिद्ध अभिनेत्री झाली ट्रोल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shilpa Shetty | अभिनेत्री शिल्पा शेट्टी अभिनयासोबतच आपल्या फिटनेस मंत्रामुळेही ओळखली जाते. मात्र काही वर्षांपुर्वी एका गोष्टीमुळे शिल्पा आणि तिच्या कुटुंबियांना टीकेचा सामना करावा लागला होता. त्या गोष्टीबाबत अजूनही शिल्पाला (Shilpa Shetty) सोशल मिडियावर ट्रोल केलं जातं.

शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा 2021 मध्ये पॉर्न फिल्म बनवण्याच्या आणि पॉर्न व्हिडीओ एका ॲप्लिकेशनवर अपलोड करण्याच्या आरोपांमुळे चर्चेत आला होता. या प्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती. राज कुंद्रा याची जमिनावर सुटका झाली. पण आजही त्याच्या या चुकीबद्दल शिल्पा आणि कुटुंबाला टिकेचा सामना करावा लागतोय.

‘पॉर्न किंग’ची बायको म्हणत अभिनेत्री ट्रोल

आजही अनेक जण राजला ‘पॉर्न किंग’ म्हणून संबोधतात. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत राज कुंद्रा याने याबाबत खुलासा केला आहे. “जर माझं लग्न शिल्पासोबत झालं नसतं, तर कोणाला काहीही फरक पडला नसता. मी अनेकांच्या निशाण्यावर आहे. पण, याचा त्रास माझ्या पत्नी आणि मुलांना होतोय,” असं राज कुंद्रा म्हणाला आहे.

शिल्पाने (Shilpa Shetty) सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला तर कमेंटमध्ये आजही ‘अरे ही तर पॉर्न किंगची बायको..’ असं ट्रोलर्स लिहितात. मी अशा लोकांना ब्लॉक करतो. मला या गोष्टींचा फरक पडत नाही. मात्र, माझ्या कुटुंबाला नाहक त्रास दिला जात आहे, असा खुलासा राजने एका मुलाखतीमध्ये केला.

शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचा खुलासा

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज कायम स्वतःचा चेहरा मास्कने लपवायचा.त्यामुळे तोंड लपवावं लागेल अशी कामं करायचीच का? असं म्हणून देखील राज याला चिडवलं जाईल. पुढे UT69 सिनेमाची घोषणा केल्यानंतर राज याने चेहऱ्यावरचा मास्क हटवला.

हा सिनेमा चांगलाच चर्चेत होता. सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला पण त्याची चर्चा खूप झाली. या चित्रपटात राजने तुरुंगात कसे दिवस काढले, याचा खुलासा करण्यात आला. आता राज आणि शिल्पा (Shilpa Shetty) दोघेही आनंदी आणि सुखी आयुष्य जगत आहेत.मात्र, आजही त्यांना सोशल मिडियावर भूतकाळातील गोष्टींमुळे ट्रोल केलं जातं.

News Title- Shocking revelation of Shilpa Shetty husband Raj Kundra

महत्त्वाच्या बातम्या –

विराट कोहलीनंतर त्याचा मित्रही झाला ‘बाबा’, चिमुकल्या परीचं आगमन

आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात; प्रियकरासोबत घेणार सातफेरे

गाडी अडवली म्हणून अभिनेत्रीने होमगार्डचे कपडे फाडले, फोन हिसकावला; गुन्हा दाखल

“मनोज जरांगे कोणाला माहित नव्हता, आज तो शरद पवारांचा बाप झालाय”

जरांगे विरूद्ध फडणवीस वाद आणखी वाढणार?; जरांगेंचा पुन्हा गंभीर इशारा