शिवलिंगवर चुकूनही ‘ही’ फुले वाहू नका; अन्यथा…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mahashivratri Special | हिंदू धर्मात भगवान शिवाची विशेष प्रकारे पूजा केली जाते. लवकरच प्रसन्न होणाऱ्या देवतांमध्ये भगवान शिव पहिल्या क्रमांकावर आहेत. म्हणून त्यांना ‘भोलेनाथ’ असंही म्हटलं जातं. त्यामुळे भोलेनाथ (Mahashivratri Special) यांना प्रसन्न करण्यासाठी शिवभक्त आपापल्या परीने पूजा करतात.

त्यातच महाशिवरात्री हा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत मोठा दिवस असतो. संपूर्ण देशात या वर्षी 8 मार्च रोजी महाशिवरात्री उत्सव साजरा केला जाईल. तसं प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीची महिमा मोठी आहे.

‘अशी’ करा महाशिवरात्रीला शंकराची आराधना

महाशिवरात्रीच्या (Mahashivratri Special) दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात, भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो.

महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. पंचगव्य म्हणजेच गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. मात्र, शिवलिंगवर काही फुले चढवणे शास्त्रात वर्ज्य मानले गेले आहे. आता ती फुले कोणती आहेत, ज्यामुळे भोलेनाथ नाराज होऊ शकतात, याची माहिती इथे दिली आहे.

शिवलिंगवर ‘या’ गोष्टी वाहू नयेत

हळद : शिवलिंगवर हळद, कुंकू लावणे वर्ज्य मानले गेले आहे. त्यामुळे तुम्ही जर शिवलिंगाची पूजा करत असाल तर, या गोष्टी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे.

नारळ पाणी : बऱ्याचदा आपण मंदिरात गेलो की, नारळ फोडतो.मात्र, शिवलिंगवर नारळ चढवणेही चुकीचे मानले गेले आहे. त्यामुळे शिवलिंगची पूजा करताना शक्यतो नारळ चढवू नये.

तुटलेले तांदूळ : यासोबतच शिवलिंगावर (Mahashivratri Special) काळे तीळ आणि तुटलेले तांदूळही चढवत नाहीत. यामुळे महादेव नाराज होऊ शकतात, असं मानलं जातं.

कुंकू : शिवलिंगावर सिंदूर म्हणजेच कुंकू किंवा अन्य शृंगाराची वस्तुदेखील चढवली जात नाहीत. त्यामुळे पूजा करताना या गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी.

खराब बेलपत्र : शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केले जाते.मात्र, ते बेलपत्र तुटलेल्या अवस्थेत नसावे.ते अगदी कोमल आणि ताजे असावे. पूजात नेहमी बेलपत्र चांगलेच असावे.

लाल रंगाचे फूल : शिवलिंगावर (Mahashivratri Special)  कधीही लाल रंगाचे फूल चढवू नयेत. तसेच केतकी, चंपा किंवा केवडा यांची फुले कधीही अर्पण करू नयेत. ही फुले अर्पण करणे शास्त्रात निषिद्ध मानले गेले आहे.

तुळशी पाने : तुळशीची पानेदेखील शिवलिंगावर अर्पण करू नयेत. भगवान शंकराला तुळशीची पाने अर्पण केल्याने भगवान शिव क्रोधित होतात. वास्तविक भगवान शिवाने तुळशीचा पती असुर जालंधरचा वध केला त्यामुळे तुळशीची पाने भगवान शंकराला अर्पण केली जात नाहीत.

News Title- Mahashivratri Special 2024

महत्त्वाच्या बातम्या –

‘अंकितासोबत लग्न…’; विकी जैनचा धक्कादायक खुलासा

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याचा मृत्यू!

बुमराहची एन्ट्री! स्टार खेळाडूला विश्रांती; अखेरच्या सामन्यासाठी टीम इंडियात मोठा बदल

विराट कोहलीनंतर त्याचा मित्रही झाला ‘बाबा’, चिमुकल्या परीचं आगमन

आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात; प्रियकरासोबत घेणार सातफेरे