HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी गुड न्यूज!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | HDFC बँकेत तुमचं खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बँकेने ग्राहकांना मोठी गुड न्यूज दिलीये. मुदत ठेव हे बऱ्याच काळापासून गुंतवणुकीचे एक सर्वसामान्यांचं आवडतं साधन राहिलं आहे. मे 2022 पासून जेव्हा RBI ने देशात व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली तेव्हापासून FD परतावा अधिक आकर्षक झाला. अशात एचडीएफसी बँकेने एफडी वरील व्याजदर वाढवले आहेत.

HDFC च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज

एचडीएफसी (HDFC) बँकेने मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात वाढ केली आहे. आता बँकेत एफडी असणाऱ्यांना फायदा होणार आहे. HDFC बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी मुदत ठेवींच्या व्याजदरात 25 बेस पॉइंट्स (bps) पर्यंत वाढ केली आहे.

नवीन व्याजदर लागू

बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 3.5% ते 7.75% दरम्यान व्याजदर देत आहे. बँकेने 18 महिन्यांपासून 21 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठीचा दर 7% वरून 7.25% केला आहे. एचडीएफसी बँक सध्या 7 ते 29 दिवसांच्या कालावधीत मुदत ठेवींवर सामान्य नागरिकांसाठी 3 टक्के व्याज दर देत आहे.

30 ते 45 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर 3.50% व्याज मिळेल, तर 46 दिवस ते सहा महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर 4.50% व्याज मिळेल.

बँक सहा महिने ते एक दिवस आणि नऊ महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर 5.75% व्याज दर देते. यासोबतच बँक 9 महिने ते एक दिवस आणि एक वर्षापेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर 6 टक्के व्याजदर देईल.

बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 3.5% ते 7.75% दरम्यान व्याज दर देते. तर बँक 18 महिन्यांपासून 21 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी सर्वाधिक 7.75% व्याज दर देत आहे. यासह, एचडीएफसी बँकेने त्यांच्या बल्क ठेव व्याजदरात पुन्हा सुधारणा केली आहे, यावेळी त्यांनी 18 महिन्यांपासून 21 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी एफडी व्याज दर 7.05 वरून 7.25% पर्यंत 20 bps ने वाढवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

शिवलिंगवर चुकूनही ‘ही’ फुले वाहू नका; अन्यथा…

मनोज जरांगे पाटील संतापले, मराठ्यांना केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन

गौतमी पाटील ‘या’ पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार?

अत्यंत धक्कादायक! शालेय पोषण आहारात चक्क मेलेल्या उंदराचे अवशेष

मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स लावत काँग्रेसचा प्रचार!