नेहा कक्करच्या संसारात वादळ?, घटस्फोटाबाबत स्पष्टच म्हणाली…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Neha Kakkar | प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर ही काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिच्या खासगी आयुष्यामुळे सध्या नेहा चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती मोठ्या पडद्यापासूनही दूर आहे. नेहा (Neha Kakkar) 2022 मध्ये इंडियन आयडल शोमध्ये जज म्हणून दिसली. त्यानंतर ती दिसलीच नाही.

त्यामुळे नेहाच्या आयुष्यात नेमकं चाललंय तरी काय, याबाबत चाहते जाणून घेण्यास उत्सुक आहेत. तिच्या वैवाहिक आयुष्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चाही होत आहेत. इतकंच नाही तर, लवकरच रोहनप्रीत सिंह आणि नेहा कक्कर घटस्फोट घेत असल्याचे सातत्याने म्हटलं जात आहे.

नेहा कक्करचा घटस्फोट होणार?

आता या सर्व चर्चेवर स्वतः नेहाने मोठा खुलासा केला आहे. एका मुलाखतीमध्ये नेहाने आपल्या आयुष्यातील खुलासे करत या चर्चेवर पूर्णविराम लगावला आहे. आपल्या खासगी आयुष्याबाबत ती (Neha Kakkar) यावेळी बोलताना दिसली.

“मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप कमजोर झाली होती. त्यामुळे मी थोडा ब्रेक घेतला होता. मी माझ्या कोणत्याही कामासाठी मनापासून मेहनत घेत असते. मात्र काही दिवसांपासून मला हे करायला फार अवघड जात होतं. म्हणून मी ब्रेक घेतला होता. पण आता मी परतली आहे,” असं नेहा म्हणाली आहे.

नेहा कक्करचा मोठा खुलासा

नेहा (Neha Kakkar) गरोदर असल्याच्या चर्चाही रंगत होत्या. यावरही तिने आपलं मौन सोडलं आहे. “जेव्हा पासून माझं गण झालंय तेव्हापासून दोन गोष्टींबद्दल सतत बोललं जातंय. ते म्हणजे, मी गरोदर आहे आणि दुसरं म्हणजे माझा घटस्फोट होणार आहे. लोकांना फक्त याचीच चर्चा करायला जास्त आवडतं. मात्र, हे अत्यंत चुकीचं आहे. मी याकडे जास्त लक्ष देत नाही. कारण, मला सत्य माहीत आहे.”, असा खुलासा यावेळी नेहाने केला.

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांचे लग्न 2021 मध्ये झालं. त्यांनी लव्ह मॅरेज केलं आहे. त्यांच्या लग्नाला आता 3 वर्ष झाली आहेत. मात्र, दोघांचे वाद टोकाला गेल्याचं सांगितलं जात होतं. हेच नाही तर आता हे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचंही म्हटलं गेलं. आता यावरच नेहाने खुलासा करत या चर्चेवर पाणी फेरलं आहे.

News Title-  Neha Kakkar disclosure on divorce talks

महत्त्वाच्या बातम्या –

शिवलिंगवर चुकूनही ‘ही’ फुले वाहू नका; अन्यथा…

मनोज जरांगे पाटील संतापले, मराठ्यांना केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन

गौतमी पाटील ‘या’ पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार?

अत्यंत धक्कादायक! शालेय पोषण आहारात चक्क मेलेल्या उंदराचे अवशेष

मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स लावत काँग्रेसचा प्रचार!