शिरूर मतदारसंघातून कोल्हेंविरोधात ‘हा’ नेता लढणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Amol Kolhe | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू आहेत. यंदाच्या लोकसभेचं गणित हे वेगळं असल्याचा अंदाज आहे. कारण यंदा एकाच पक्षाचे दोन पक्ष झाले आहेत. यामुळे आता मतदारांमध्ये संभ्रम पाहायला मिळतो. बारामती मतदारसंघाप्रमाणे यंदा शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याविरोधात (Amol Kolhe) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ताकदवान उमेदवार देणार असल्याचं चॅलेंज त्यांनी दिलं होतं. अशातच आता पुन्हा एकदा त्याच मतदारसंघाची चर्चा आहे.

अमोल कोल्हेविरोधात ‘हा’ भाजपचा आमदार लढणार?

शिरूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी मागील लोकसभेला आढळराव पाटील यांच्याविरोधात विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याविरोधात ते लोकसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चा आहेत. मात्र आता भाजपचे पुण्यातील भोसरीतील आमदार महेश लांडगे यांनी शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे.

अजित पवार आणि शरद पवार यांच्यात उभी फूट पडल्याने यंदाच्या उमेदवारांच्या विजयाबाबत भाकित करणं थोडसं कठीण राहणार आहे. बारामती मतदारसंघाप्रमाणे आता शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे निवडणूक लढवणार आहे. काही महिन्यांआधी अजित पवार म्हणाले होते की मी आता अमोल कोल्हे यांना सांगून पाडणार. त्यांच्या विरोधात मी माझा उमेदवार देणार आहे.

भोसरी मतदारसंघाचे भाजपचे आमदार महेश लांडगे हे आता शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यांनी चाकण येथे सभेमध्ये बोलत असताना शिरूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा दावा महेश लांडगे यांनी केला आहे.

काय म्हणाले महेश लांडगे?  

शिरूर मतदारसंघावर भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी आपली भूमिका मांडली आहे. यावेळी बोलत असताना ते म्हणाले की, शिरूर मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार लढावा. कारण शिरूर हा 36 वा मतदारसंघ आहे. 36 क्रमांक हा माझा लकी क्रमांक आहे. मतदारांची बेरीज 9 तर माझी जन्म तारीख 9 आहे, असं महेश लांडगे म्हणाले आहेत.

चाकण येथे बुथ कमिटीची सभा होती त्यावेळी महेश लांडगे यांनी शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यानंतर या ठिकाणी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक देखील उपस्थित होते.

News Title – Amol kolhe Against Mahesh Landge BJP Mla Assembly Election

महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडियासाठी वाईट बातमी; ‘हा’ खेळाडू हॉस्पिटलमध्ये दाखल

नेहा कक्करच्या संसारात वादळ?, घटस्फोटाबाबत स्पष्टच म्हणाली…

निलेश राणेंना पुणे महानगरपालिकेचा दणका; पुण्यातील मॉल केलं सील

सावधान! ‘या’ 10 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

“आमच्या काकांनी मला अडचणीत आणण्यासाठी…”; रोहित पवारांचा गंभीर आरोप