सावधान! ‘या’ 10 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rain Update | राज्यातील वातावरणात सारखा बदल होताना दिसत आहे. कधी उन्हाच्या झळा जाणवतायेत. तर कधी थंडी. तसेच अधून मधून ढगाळा वातावरण देखील पाहायला मिळतंय. अशात हवामान विभागाने पावसाची शक्यता (Rain Update) वर्तवली आहे.

10 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

28 फेब्रुवारी ते 1 मार्च असे 3 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर अशा 10 जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

10 जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता असल्याचं मत जेष्ठे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलं आहे.

अवकाळी पावसाची शक्यता

मराठवाड्यातील संपूर्ण 8 जिल्ह्यात आज 28 फेब्रुवारी ते 2 मार्च असे 4 दिवस ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता (Rain Update) जाणवत असल्याचं माणिकराव खुळे म्हणाले. बुधवार आणि गुरुवार 28 आणि 29 फेब्रुवारीला 2 दिवस मराठवाडयात गारपीटीचीही शक्यताही जाणवत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, अहमदनगर अशा 5 जिल्ह्यात व लगतच्या परिसरात आजपासून 1 मार्चपर्यंत असे 3 दिवस गारपीटीचीही शक्यताही जाणवत असल्याचे खुळे म्हणाले.

पुढील दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“आमच्या काकांनी मला अडचणीत आणण्यासाठी…”; रोहित पवारांचा गंभीर आरोप

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी गुड न्यूज!

शिवलिंगवर चुकूनही ‘ही’ फुले वाहू नका; अन्यथा…

मनोज जरांगे पाटील संतापले, मराठ्यांना केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन

गौतमी पाटील ‘या’ पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार?