पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, 1 मार्चपासून होणार मोठा बदल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune Metro | पुणे मेट्रो (Pune Metro) प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या 1 मार्चपासून मेट्रो प्रवाशांना परतीच्या प्रवासाचे तिकीट मिळणार नाही. महामेट्रोच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागणार आहे.

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

पुणे मेट्रोच्या (Pune Metro)  प्रवाशांसाठी रिटर्न तिकीट सेवा बंद करण्याचा महामेट्रोने निर्णय घेतला आहे. या नियम 1 मार्चपासून लागू होणार असून प्रवाशांना प्रवासादरम्यान एक तिकीट घेण्याऐवजी येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र तिकीट काढावे लागणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.

महामेट्रोचा निर्णय काय?

प्रत्येक मेट्रो स्थानकावरील तिकीट काउंटरवर सकाळ-संध्याकाळ प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांना मेट्रो ॲप, व्हॉट्सॲप क्रमांक, एटीव्हीएम मशीनद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा मेट्रो प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे.

सुरुवातीला महामेट्रोने प्रवाशांना तिकीट काढल्यानंतर 20 मिनिटांत प्रवास करणं बंधनकारक केलं होतं. कारण बरेच प्रवासी तिकीट खरेदी करून मेट्रो स्टेशनवर जातात. आतमध्ये जाऊन निवांत बसतात. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांची गैरसोय होते. यावर उपाय म्हणून महा मेट्रोने प्रवाशांना तिकिट खरेदी केल्यानंतर 20 मिनिटांनी प्रवास करणे बंधनकारक केले आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे मेट्रोने प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी तिकीट सेवा दिली होती. मात्र महा मेट्रोने 1 मार्चपासूनच सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महामेट्रोच्या निर्णयामुळे प्रवाशांना जाणं आणि परत येणं दोन्हीसाठी तिकीट खरेदी करावं लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘इतक्या’ लाख कुटुंबांना घर देणार, सरकारची मोठी घोषणा

शिरूर मतदारसंघातून कोल्हेंविरोधात ‘हा’ नेता लढणार?

रणवीर सिंहचा साधेपणा; आलिबागमधील खेडे गावातील तरूणांसोबत घालवला वेळ

टीम इंडियासाठी वाईट बातमी; ‘हा’ खेळाडू हॉस्पिटलमध्ये दाखल

नेहा कक्करच्या संसारात वादळ?, घटस्फोटाबाबत स्पष्टच म्हणाली…