Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणाला आता वेगळं वळण मिळालं आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी काही दिवसांआधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर अनेक नेते संतापले आहेत. त्यानंतर अंतरवाली सराटीतील आंदोलन स्थळाचा मंडप काढण्यावरून वाद सुरू होता. यानंतर आता भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी संताप व्यक्त केला आहे. जरांगे (Manoj Jarange Patil) यांना आता माफी नाही असं ते म्हणाले आहेत.
काय म्हणाले गिरीश महाजन?
मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) हे समाजाचे नेतृत्व करणारे आहेत. सरकारने आतापर्यंत अवाक्याच्या बाहेर मदत केली आहे. मनोज जरांगे म्हणतील तेच सरकारने केलं आहे. तसेच समाजाचे नेतृत्व करणारे म्हणून त्यांचा सन्मान केला. समाजाचा वापर करत त्यांनी स्वार्थी राजकीय अजेंडा रेटला आहे, असा हल्ला गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला आहे.
मी जरांगे पाटील यांच्यासोबत अनेकदा बोललो आहे. मी त्यांच्या उपोषणस्थळी सहा वेळा गेलो आहे. यावेळी मंत्रीमंडळातील सहकारी देखील होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला प्रोटोकॉल बाजूला ठेऊन दोन वेळा तिथं गेले आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं आहे. तरीही मी बोलेन तसंच करा, अशी त्यांची भूमिका आहे.
“आता माफी नाही”
आधी छगन भुजबळ त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आल्या आहेत. त्यांना जातीवरून शिवीगाळ केली आई-बहिणींवरूण बोलले यामुळे त्यांना आता माफी नाही, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.
मनोज जरांगे जे म्हणाले ते कोणालाच आवडलं नाही. मराठा बांधवांना ते आवडलेलं नाही. म्हणून आता मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आवाक्यातच बोलावं. तुम्हाला संपवू तुमच्या पक्षाचा सत्यानाश करू, असं ते म्हणाले होते.
ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करतात. लोकं बघून त्यांच्या डोक्यात हवा गेली होती. तर आता लोकांनीही त्यांना डोक्यावरून उतरवलं आहे. ते राष्ट्रवादी आणि शिवसेनेची स्क्रिप्ट वाजवतात, असं गिरीश महाजन म्हणाले.
News Title – Manoj Jarange Patil Against Girish mahajan news update
महत्त्वाच्या बातम्या
‘इतक्या’ लाख कुटुंबांना घर देणार, सरकारची मोठी घोषणा
शिरूर मतदारसंघातून कोल्हेंविरोधात ‘हा’ नेता लढणार?
रणवीर सिंहचा साधेपणा; आलिबागमधील खेडे गावातील तरूणांसोबत घालवला वेळ