तापसी पन्नू लग्न करणार असल्याची चर्चा; अभिनेत्रीचं सूचक विधान, म्हणाली…

Taapsee Pannu | बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या लग्नाच्या बातम्यांनी सर्वत्र चर्चेत आहे. एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ती तिचा बॉयफ्रेंड बॅडमिंटनपटू मॅथियास बो याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. यावर आता स्वतः तापसीची प्रतिक्रिया समोर आली आहे. 27 फेब्रुवारीला बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू अचानक प्रकाशझोतात आली. तापसी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला. तिच्या भावी पतीपासून तिच्या लग्नाच्या ठिकाणापर्यंत अशा अनेक गोष्टींची चर्चा होऊ लागली.

लग्नाची चर्चा सुरू असताना तापसीने एक सूचक विधान केले आहे. किंबहुना तिने लग्नाबद्दल बोलणे टाळल्याचे दिसते. एका मुलाखतीत तिला तिच्या लग्नाबाबत सुरू असलेल्या चर्चेबद्दल विचारण्यात आले. मात्र, याबाबत तिने स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. ती म्हणाली की, मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत कधीही स्पष्टीकरण दिलेले नाही आणि कधीच देणार नाही.

अभिनेत्रीने सोडले मौन

तापसी पन्नूच्या या उत्तरामुळे ती लग्न करणार आहे की नाही हे स्पष्ट होत नाही. तापसी आणि मथियास मार्चमध्ये उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचे वृत्त एका रिपोर्टमध्ये देण्यात आले होते. या लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे बॉलिवूड स्टार्स उपस्थित राहणार नाहीत, असे सांगण्यात येत आहे.

शीख आणि ख्रिश्चन धर्माच्या रितीरिवाजानुसार दोघेही लग्न करणार असल्याचेही सांगण्यात आले. खरं तर मॅथियास बो हा माजी डॅनिश बॅडमिंटनपटू आहे, जो चार वर्षांपूर्वी 2020 मध्ये निवृत्त झाला. तापसी पन्नूच्या वैयक्तिक जीवनाच्या पलीकडे असलेल्या प्रोफेशनल लाईफबद्दल भाष्य करायचे झाले तर, ती गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शाहरुख खानसोबत ‘डिंकी’ चित्रपटात दिसली होती.

Taapsee Pannu लग्न करणार असल्याची चर्चा

चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर डिंकी हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी OTT वर आला. तेव्हापासून तो नेटफ्लिक्सवर सतत ट्रेंड करत आहे. लोकांना या चित्रपटाची कथा भुरळ घालत आहे आणि या चित्रपटाने जगभरात 450 कोटींहून अधिक कमाई केली.

दोन दिवसांपासून तापसी पन्नू विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. तेव्हापासून ती सोशल मीडियावर ट्रेंड बनली आहे. मात्र तापसीच्या प्रतिक्रियेनंतर या चर्चांना तूर्त पूर्णविराम लागू शकतो.

News Title- Bollywood actress Taapsee Pannu has commented on the marriage talk
महत्त्वाच्या बातम्या –

BCCI चा वार्षिक करार! किशन-अय्यरला वगळलं; विराट-रोहितसह दोघांना मिळणार 7 कोटी

“आता लोकांनीही जरांगेंना डोक्यावरून उतरवलं, त्यांना माफी नाहीच”

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, 1 मार्चपासून होणार मोठा बदल

‘इतक्या’ लाख कुटुंबांना घर देणार, सरकारची मोठी घोषणा

शिरूर मतदारसंघातून कोल्हेंविरोधात ‘हा’ नेता लढणार?