Jharkhand Train Accident | झारखंडमधील जामतारा जिल्ह्यात बुधवारी रात्री रेल्वेचा भीषण अपघात झाला. येथे 12 जणांना रेल्वेने धडक दिली, त्यापैकी दोन जणांचे मृतदेह रेल्वे रुळाजवळ सापडले. अनेक जण जखमीही झाले आहेत. त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व जण आसनसोल-झाझा पॅसेंजर ट्रेनमधून प्रवास करत होते. तांत्रिक बिघाडामुळे कालझरियाजवळ गाडी थांबवण्यात आली. यावेळी लोक रेल्वेतून उतरून रेल्वे रुळावर उभे राहिले.
त्यानंतर समोरून येणाऱ्या भागलपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसने त्यांना धडक दिली. झारखंडमधील जामतारा जिल्ह्यातील या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. भागलपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसने 12 जणांना धडक दिली. माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री रेल्वे रुळाजवळ अंधार असल्याने बचावकार्यात मोठी अडचण आली.
भागलपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसची धडक
जामतारा-करमातांड येथील काळझरियाजवळ सुमारे 12 जणांना रेल्वेने धडक दिली, त्यातील सर्वांचा मृत्यू झाल्याचे कळते. या अपघातात इतर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. रेल्वे अपघातानंतर रेल्वे पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.
पोलीस-प्रशासनाच्या मदतीसाठी स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित आहेत. आसनसोल-झाझा पॅसेंजर ही गाडी जामतारा-करमातांड दरम्यान कालाझरिया रेल्वे थांब्यावर तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले. काही प्रवासी रेल्वेतून उतरून रेल्वे रुळावर उभे होते.
Jharkhand Train Accident 12 जण दगावले
त्यानंतर भागलपूर-यशवंतपूर एक्स्प्रेस गाडी तिथून पुढे गेली, जिने 12 जणांना धडक दिली. जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हा अपघात बुधवारी सायंकाळी झाला. रेल्वे रुळावर उभे असताना प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून उडी मारली की दुसऱ्या ट्रेनची धडक बसली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. सध्या घटनास्थळी जखमींचा शोध घेण्यात येत असून त्यांना रुग्णालयात नेण्यात येत आहे. रेल्वे रुळावर बऱ्यापैकी अंधार असल्याने बचावकार्यात मोठी अडचण आली.
News Title- 12 people were killed in a horrific train accident in Jharkhand’s Jamtara district on Wednesday night
महत्त्वाच्या बातम्या –
तापसी पन्नू लग्न करणार असल्याची चर्चा; अभिनेत्रीचं सूचक विधान, म्हणाली…
BCCI ची कारवाई! इशान आणि श्रेयसचा ‘पगार’ बंद; जय शाहंनी दिला होता इशारा
BCCI चा वार्षिक करार! किशन-अय्यरला वगळलं; विराट-रोहितसह दोघांना मिळणार 7 कोटी
“आता लोकांनीही जरांगेंना डोक्यावरून उतरवलं, त्यांना माफी नाहीच”