Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन, उपोषण करताना दिसत आहेत. यावेळी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं ते अनेकदा बोलले आहेत. मात्र आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे राजकारणात प्रवेश करतील आणि वंचित बहुजन आघाडी पक्षातून लढतील अशा चर्चांना उधाण आलं आहे.
वंचित बहुजन आघाडी पक्षाची आज बैठक झाली आहे. यामध्ये वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बैठकीमध्ये काही निर्णय घेतले आहेत. त्यापैकी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना जालना मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी मागणी केली आहे. काही महत्त्वाचे निर्णय बैठकीत घेण्यात आले आहेत.
काय घडलं बैठकीत?
जालना मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील यांना लोकसभा निवडणुकीचे तिकिट जाहीर करावं आणि पुणे येथून डॉ. अभिजीत वैद्य यांना देखील उमेदवार म्हणून जाहीर करावं.
महाविकास आघाडीच्या यादीमध्ये किमान 15 ओबीसी उमेदवार निवडणुकीमध्ये असावेत.
पक्ष आणि पक्षातील उमेदवाराने निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतर पक्ष सोडून भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार नाही.
किमान 3 अल्पसंख्यांक उमेदवार असावेत
वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले की “जून-जुलैमध्ये आम्ही काही मतदारसंघाची यादी काढली आहे. ती यादी आम्ही आता महाविकास आघाडीला दाखवली आहे. त्यातील काही जागांच्याबाबतीत अपवाद वगळता इतर जागांवर महाविकास आघाडीशी आम्ही चर्चा करणार आहोत”, अशी माहिती त्यांनी दिली.
27 पैकी काही जागा अपवाद धरता इतर जागांवर आम्ही महाविकास आघाडीशी चर्चा करणार आहोत. जालना मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील यांना लोकसभा निवडणुकीचे तिकिट जाहीर करावं आणि पुणे येथून डॉ. अभिजीत वैद्य यांना देखील कॅण्डिडेट म्हणून जाहीर करावं, अशी माहिती समोर आली आहे.
काही दिवसांआधी मनोज जरांगे पाटील हे राजकारणात येण्याचा कोणताही हेतू नसल्याचं म्हणत होते. मात्र आता थेट प्रकाश आंबेडकर यांनी नाव घेत मनोज जरांगे पाटील यांना जालना लोकसभेचं तिकिट द्यावं अशी मागणी केली आहे.
News Title – Manoj Jarange Patil Will candidate of jalna Assembly election
महत्त्वाच्या बातम्या
“आता लोकांनीही जरांगेंना डोक्यावरून उतरवलं, त्यांना माफी नाहीच”
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, 1 मार्चपासून होणार मोठा बदल
‘इतक्या’ लाख कुटुंबांना घर देणार, सरकारची मोठी घोषणा
शिरूर मतदारसंघातून कोल्हेंविरोधात ‘हा’ नेता लढणार?
रणवीर सिंहचा साधेपणा; आलिबागमधील खेडे गावातील तरूणांसोबत घालवला वेळ