अभिनेत्री दीपिका पादुकोणने दिली मोठी गुड न्यूज; पोस्ट करत म्हणाली..

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Deepika Padukone | नुकतेच अभिनेत्री अनुष्का शर्माने मुलीला जन्म दिला आहे. या बातमीमुळे विराट कोहली आणि अनुष्काच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेना झाला होता. आता बॉलीवुडमधील अनुज एका अभिनेत्रीने गुड न्यूज दिली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण(Deepika Padukone) लवकरच बाळाला जन्म देणार आहे.

दीपिका आणि रणवीर सिंह लवकरच आई-बाबा होणार आहेत. दीपिकाने सोशल मिडियावर पोस्ट करत चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे. तिच्या या पोस्टवर तासाभरातच लाखो लाईक्स आले आहेत. चाहते भरभरून तिला शुभेच्छा देत आहेत.

पोस्टद्वारे दीपिकाची घोषणा

दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) इंस्टाग्रामवर पोस्ट करत गरोदर असल्याची घोषणा केली आहे. सप्टेंबर महिन्यात ती बाळाला जन्म देणार असल्याची माहिती तिने पोस्टद्वारे दिली आहे. दीपिका आणि रणवीर आता आई-बाबा होणार आहेत. दीपिकाच्या या पोस्टवर फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अभिनेत्री सोनम कपूर, प्रियांका चोप्रा, आयुष्मान खुराना, श्रेया घोषाल यांनी दीपिका आणि रणवीर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. वयाच्या 38 व्या वर्षी दीपिका तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. चाहते दीपिका कधी खुशखबरी देणार याची वाट पाहात होते. अखेर, दीपिकाने चाहत्यांना खुशखबर दिली.

दीपिका आणि रणवीर हे बॉलिवूडमधील फेमस कपलपैकी एक आहेत. ‘रामलीला’ चित्रपटाच्या सेटवर दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. 2012 मध्ये त्यांनी डेटिंगला सुरुवात केली. त्यानंतर 2018 मध्ये दोघांनी इटलीतील लेक कोमो येथे डेस्टिनेशन वेडिंग केलं.

दीपिका देणार बाळाला जन्म

दीपिका (Deepika Padukone) गरोदर असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होत्या. नुकत्याच पार पडलेल्या बाफ्टा पुरस्कार सोहळ्यात बाॅलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी दिपीकाने सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाचीने डिझाईन केलेली शिमरी साडी नेसली होती आणि याच साडीमध्ये दिपीका पदु कोण (Deepika Padukone) बेबी बंप लपवताना दिसून आली.

या साडीतील अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. तेव्हापासूनच दीपिका पादुकोण लवकरच आई होणार असल्याचं म्हटलं गेलं.आता ही बातमी खरी ठरली आहे. स्वतः दीपिकाने याची घोषणा केली आहे.

News Title :  Deepika Padukone Ranveer Singh announce pregnancy

महत्त्वाच्या बातम्या-

अक्षय कुमारकडून मुलींचे वसतिगृह बांधण्यासाठी 1 कोटी रूपयांचे दान!

सामन्यादरम्यान चाहत्याचा मैदानात शिरकाव; स्टार्कच्या पत्नीनं शिकवला चांगलाच धडा

सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय अन् बाबा रामदेव यांचे 2300 कोटींचे नुकसान!

झारखंड! रेल्वेचा भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू, भागलपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसची धडक

तापसी पन्नू लग्न करणार असल्याची चर्चा; अभिनेत्रीचं सूचक विधान, म्हणाली…