“लग्नानंतर व्यक्ती कधीही..”, कॅटरिनासोबतच्या नात्यावर विकी कौशलचा मोठा खुलासा

Vicky and Katrina

Vicky Kaushal | अभिनेता विकी कौशल व अभिनेत्री कॅटरिना कैफ फेमस कपलपैकी एक आहे. दोघांचाही चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. सोशल मीडियावर दोघेही कायम सक्रिय असतात. विकी व कॅटरिना एकमेकांबरोबरचे अनेक फोटो शेअर करत असतात.

आता विकी कौशलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्याने कॅटरिनाबरोबरच्या नात्यावर भाष्य केलं आहे. दोघांनी 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. मात्र लग्नाच्या अडीच वर्षांनी विकी पहिल्यांदाच आपल्या पर्सनल लाईफबद्दल बोलताना दिसला.

काय म्हणाला विकी कौशल?

एका मुलाखतीमध्ये विकीला लग्नानंतर त्याच्यात काय बदल झाला, असा प्रश्न करण्यात आला. यावर तो म्हणाला की, एकमेकांची काळजी करणं आणि त्यांच्यावर मनापासून जिवापाड प्रेम करणं ही प्रेमाची बाजू मला जास्त आवडते. जेव्हा मी कॅटरिनाबरोबर असतो तेव्हा मला सगळं सुरळीत सुरू असल्याचं जाणवतं. लग्नानंतरच्या अडीच वर्षांत मी एवढा समजूतदार बनलो आहे, जेवढा मी गेल्या 33 वर्षांत कधीच नव्हतो.

अगोदर मी खूप लहान-सहान गोष्टींवरून खूप अडून राहायचो. जसं की जेवायला काय मागवायचं, सुट्टीत कुठे फिरायला जायचं; पण आता आम्ही गंभीर विषयांवरही चर्चा करून मार्ग काढतो. माझ्यात हा बदल कॅटरिनामुळे झाला आहे, असा खुलासा यावेळी विकीने केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

“कॅटरिना माझ्यासाठी माझं सर्वकाही आहे”

पुढे तो म्हणाला की, लग्नानंतर व्यक्ती कधीही अगोदर सारखी राहात नाही. आपण कोणाबरोबर तरी जगणार आहोत ही एक वेगळी भावना असते. लग्नाआधी फक्त तुम्ही असता. तेव्हा तुमचे निर्णय हे फक्त तुमचे असतात. पण, तुम्ही जेव्हा लग्न करता तेव्हा तुम्ही दोघं असता. लग्नानंतर तुमचं आयुष्य बदलतं. मी स्वत:जास्त रोमँटिक नाही; पण कॅटरिना मला रोमँटिक बनवते. ती माझ्यासाठी माझं सर्वकाही आहे.

विकी आणि कॅटरिना यांनी 9 डिसेंबर 2021 मध्ये लग्न केलं. राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह पार पडला. दोघेही आपलं आनंदी आयुष्य जगत आहेत.

News Title- Vicky Kaushal big revelation on his relationship with Katrina

महत्त्वाच्या बातम्या –

अफाट यश मिळवायचंय?, मग ‘या’ गोष्टी कायम लक्षात ठेवा!

मनोज जरांगे पाटील ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार, पक्ष ठरला?

अक्षय कुमारकडून मुलींचे वसतिगृह बांधण्यासाठी 1 कोटी रूपयांचे दान!

सामन्यादरम्यान चाहत्याचा मैदानात शिरकाव; स्टार्कच्या पत्नीनं शिकवला चांगलाच धडा

सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय अन् बाबा रामदेव यांचे 2300 कोटींचे नुकसान!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .