नशेत धूत होऊन सलमान पोहोचला सेटवर, डायरेक्टरनं केलं असं काही की..

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Salman Khan | अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. आजही त्याचे चित्रपट फक्त त्याच्यामुळे फेमस होतात. मात्र, सलमानची दुसरी बाजू म्हणजे त्याला व्यसनाची प्रचंड सवय असल्याचं आजही म्हटलं जातं. याचे अनेक किस्सेही सर्वांना माहित आहेत.

असाच एक किस्सा त्याचा समोर आला आहे. ज्या बद्दल कुणालाच अधिक ठाऊक नाही. सिनेमाच्या सेटवर दारू पिऊन सलमान कॅमेरासमोर उभा राहिला होता, मग पुढे जे झालं ते ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल. त्यानं स्वत: याबद्दल सांगितलं होतं.

सलमानचा हा किस्सा ‘चल मेरे भाई’ सिनेमाच्या शुटींग वेळचा आहे. या सिनेमात सलमान खानबरोबर संजय दत्त प्रमुख भूमिकेत होता. याच सिनेमातील एका सीनमध्ये सलमान खानला दारू प्यायलेल्या व्यक्तीची भूमिका साकारायची होती.

सिनेमाच्या सेटवर सलमान दारू पिऊन आला

या सीनसाठी सलमानने खरोखरंच दारू पिली होती. सीनच्या वेळी सलमान खान दारू पिऊन आला होता. सलमानला त्या अवस्थेत पाहून सगळेच शॉक झाले होते. सलमान खान (Salman Khan) तेव्हा इतका नशेत धुंद झाला होता की, त्याच्यामुळे सिनेमाचं शुटींग थांबवावं लागलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

या बद्दल सलमान खानने ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये खुलासा केला होता. सलमानला दारू प्यायलेल्या माणसाची अँक्टिंग करायची होती. पण अनेकदा सीन शुट करुनही तो ओके होत नव्हता. म्हणून सलमान खान खरोखरच दारू पिऊन आला. यामुळे पुढे डायरेक्टरनं थेट शूटच कॅन्सल केलं होतं.

सलमान आणि ऐश्वर्या रिलेशनशिप

सलमानचे (Salman Khan) असे अनेक किस्से आहेत, ज्यामुळे आजही त्याबाबत चर्चा होते. सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय एकेकाळी नात्यात होते. मात्र, सलमानच्या वागणुकीमुळे ऐश्वर्याने त्याची साथ सोडल्याचं म्हटलं जातं. पुढे ऐश्वर्याने अभिषेक बच्चन सोबत संसार थाटला. मात्र, सलमान अजूनही अविवाहित आहे.

News Title-  The story of Salman Khan drinking alcohol on the movie set

महत्त्वाच्या बातम्या –

अफाट यश मिळवायचंय?, मग ‘या’ गोष्टी कायम लक्षात ठेवा!

मनोज जरांगे पाटील ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार, पक्ष ठरला?

अक्षय कुमारकडून मुलींचे वसतिगृह बांधण्यासाठी 1 कोटी रूपयांचे दान!

सामन्यादरम्यान चाहत्याचा मैदानात शिरकाव; स्टार्कच्या पत्नीनं शिकवला चांगलाच धडा

सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय अन् बाबा रामदेव यांचे 2300 कोटींचे नुकसान!