मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांना दहा टक्के आरक्षण मान्य पण…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणासाठी लढताना दिसत आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी असून ते आता आपल्या मागणीवर ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारने काही दिवसांआधी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याबाबत हिरवा कंदील दाखवला. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी दहा टक्के आरक्षण मान्य केलं असून यावर एक अट असल्याचं सांगितलं आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली असून यावेळी त्यांनी मराठा सामाजाला सरकारने मागास असल्याचं सिद्ध केलं आहे. यामुळे आम्ही दहा टक्के आरक्षण घेण्यासाठी मान्यता दिली आहे, पण हे दहा टक्के आरक्षण आम्हाला ओबीसीतूनच द्यावंं अशी आमची मागणी आहे, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले आहेत.

गिरीश महाजन यांच्यावर पलटवार

यावेळी बोलत असताना त्यांनी गिरीश महाजन यांचा समाचार घेतला आहे. “मोदीसाहेब आले गेले, मला चॅलेंज देऊ नका, जनता आम्हाला कळते, तुम्ही आमचे काय लाड केले, मला बोलायला लावू नका, समाजाला एक सांगतो मी सामाजासाठी लढत आहे, समाजच माझा मालक आहे. त्यांच्या शब्दापुढं मी जात नाही”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

प्रकाश आंबेडकरांकडून ऑफर

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून लोकसभा निवडणुकीची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. बुधवारी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची बैठक पार पडली यामध्ये त्यांनी जरांगे यांना जालन्याची सीट देण्याबाबत चर्चा केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या ऑफरवर प्रतिक्रिया

प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून लोकसभेचं तिकिट देण्याबाबत मागणी केली आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी प्रकाश आंबेडकर यांचा कसा शब्द टाळू, तरीही माझा फोकस फक्त आरक्षणावर आहे.

राजकीय लढा नाही, माझा समाजिक लढा आहे. मी माझ्या समाजाविरोधात जाणार नाही”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

News Title – Manoj Jarange Patil Reply On prakash ambedkar

महत्त्वाच्या बातम्या

अफाट यश मिळवायचंय?, मग ‘या’ गोष्टी कायम लक्षात ठेवा!

मनोज जरांगे पाटील ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार, पक्ष ठरला?

अक्षय कुमारकडून मुलींचे वसतिगृह बांधण्यासाठी 1 कोटी रूपयांचे दान!

सामन्यादरम्यान चाहत्याचा मैदानात शिरकाव; स्टार्कच्या पत्नीनं शिकवला चांगलाच धडा

सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय अन् बाबा रामदेव यांचे 2300 कोटींचे नुकसान!