Salman Khan | अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे. एकेकाळी दोघेही प्रेमात आकंठ बुडाले होते. ते दोघे लग्न करणार असंही तेव्हा म्हटलं गेलं. मात्र सलमानची (Salman Khan) व्यसन करण्याची सवय ऐश्वर्याला रुचत नसल्याने तिने वेगळं होण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जातं.
सलमानशी नातं तोडल्यानंतर ऐश्वर्याने अभिषेक बच्चन याच्याशी संसार थाटला. मात्र सलमान अजूनही अविवाहितच आहे. अजूनही तो ऐश्वर्याला विसरला नसल्याचं म्हटलं जातं. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यात सलमान ऐश्वर्यासोबतचं गाणं ऐकल्यानंतर ढसाढसाच रडताना दिसून आला.
ऐश्वर्याच्या आठवणीत सलमानला अश्रु अनावर
1990 च्या दशकात सलमान खान (Salman Khan) आणि ऐश्वर्या राय यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या चर्चेत होत्या. पण दोन वर्षांच्या नात्यानंतर सलमानच्या वृत्तीमुळे ऐश्वर्या आणि सलमानचं ब्रेकअप झालं. त्यांनी सोबत अनेक चित्रपटांत काम केलं आहे. त्यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या सुपरहिट चित्रपटातील एक गाणं ऐकल्यानंतर सलमानला अश्रू अनावर झाले.
View this post on Instagram
‘हम दिल दे चुके सनम’या चित्रपटातील ‘तडप-तडप के इस दिल से’ हे गाणे इस्माईल दरबारने संगीतबद्ध केले होते आणि केकेने गायले होते. ‘सा रे ग म’ या सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये जेव्हा एका स्पर्धकाने सलमान खानसमोर हे गाणे गायले तेव्हा सलमान खानला आपले अश्रू आवरता आले नाहीत.
सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल
हे गाणे ऐकताच त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले. यावेळी सलमान (Salman Khan) कॅमेऱ्यात त्याचे अश्रू पुसताना पकडला गेला. दरम्यान, सोशल मीडियावर त्याचा हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याच्या या व्हिडीओवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत.
‘सलमान अजूनही ऐश्वर्याला विसरला नाही’, अशा प्रतिक्रिया त्यावर उमटत आहेत. सध्या ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याचं म्हटलं जातंय. त्यातच हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सध्या याचीच चर्चा होत आहे.
News Title- Salman Khan Aishwarya Rai Relationship
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! आमदार रोहित पवारांना धक्का, अडचणी आणखी वाढणार
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांना दहा टक्के आरक्षण मान्य पण…
नशेत धूत होऊन सलमान पोहोचला सेटवर, डायरेक्टरनं केलं असं काही की..
“लग्नानंतर व्यक्ती कधीही..”, कॅटरिनासोबतच्या नात्यावर विकी कौशलचा मोठा खुलासा
अभिनेत्री दीपिका पादुकोणने दिली मोठी गुड न्यूज; पोस्ट करत म्हणाली..