मोठी बातमी समोर! मंत्रालयात घडलेल्या प्रकाराने महाराष्ट्रात खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मुख्यमंत्री सचिवालयात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची खोटी सही आणि शिक्के वापरल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडालीये.

मंत्रालयात घडलेल्या प्रकाराने खळबळ

मुख्यमंत्र्यांची (Eknath Shinde) बनावट सही आणि शिक्का असलेली काही निवेदने समोर आली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सचिवालयात कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांची बनावट स्वाक्षर आणि शिक्के असल्याचं आढळून आलं .

चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी सही आणि शिक्के वापरले

मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद व बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. बनावट सही आणि शिक्का मारल्याचं लक्षात आल्यानंतर मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मुख्यमंत्र्यांची सही आणि शेरे असलेली निवेदने व पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयात येतात. या निवेदनांची नोंद टपाल शाखेत होते. त्यानंतर ती ई ऑफिस प्रणालीत नोंद करण्यात येतात. तिथून ती कागदपत्रे, निवेदने संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवण्यात येतात.

मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दाखल घेतली असून तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. यावरून मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पोलीस देखील या प्रकरणाकडे लक्ष देऊन आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! आमदार रोहित पवारांना धक्का, अडचणी आणखी वाढणार

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांना दहा टक्के आरक्षण मान्य पण…

नशेत धूत होऊन सलमान पोहोचला सेटवर, डायरेक्टरनं केलं असं काही की..

“लग्नानंतर व्यक्ती कधीही..”, कॅटरिनासोबतच्या नात्यावर विकी कौशलचा मोठा खुलासा

अभिनेत्री दीपिका पादुकोणने दिली मोठी गुड न्यूज; पोस्ट करत म्हणाली..